इस्रायल इराणच्या आण्विक तळांवर हल्ल्याच्या तयारीत, पण अमेरिकेचा विरोध...

Israel Iran War : इराणवर नवीन निर्बंध लादणार
इस्रायल इराणच्या आण्विक तळांवर हल्ल्याच्या तयारीत, पण अमेरिकेचा विरोध...
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल-इराण संघर्ष (Israel Iran War) वाढला आहे. दरम्यान, इराणने (Iran) केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल (Israel) इराणच्या आण्विक तळांवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन (US President Joe Biden) यांनी बुधवारी इराणच्या आण्विक तळांवर हल्ला करण्याच्या कथित योजनेबद्दल आपण इस्रायलच्या विरोधात असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी इस्रायलने मर्यादा सोडू नये, असा सूर व्यक्त केला.

इराणने मंगळवारी रात्री इस्रायलवर (Iran Attacks Israel) १८० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. दरम्यान, इस्रायलने अनेक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा केला. इराणला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा इस्रायल आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी इराणला दिला. आता तर युद्धाची व्याप्ती (Middle East tensions) वाढताना दिसत आहे.

इस्रायलला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार, पण...

मंगळवारच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायल इराणच्या आण्विक सुविधांवर आणि तेल साठ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. याबाबतच्या वृत्तांवर प्रतिक्रिया देताना, बायडेन म्हणाले की, इस्रायलला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे. पण त्यांना जे काही करायचे आहे; ते मर्यादेत राहून करायला हवे, असे वृत्त द टाइम्स ऑफ इस्रायलने दिले आहे.

इराणवर नवीन निर्बंध लादणार, G7 नेत्यांची बैठक

दरम्यान, त्यांनी इराणवर नवीन निर्बंध लादण्याच्या शक्यतेवर जी ७ (G7) नेत्यांशी चर्चा केली. G7 नेत्यांची बैठक एका फोन कॉलवर झाली. याबाबत व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की बायडेन यांनी इराण विरूद्ध नवीन निर्बंध लादण्याबाबतच्या एकमतासाठी समन्वय साधला. बायडेन यांच्यासह G7 नेत्यांनी इस्रायलवर इराणने केलेल्या हल्ल्याचा स्पष्ट शब्दांत निषेध नोंदवला." यामुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढला आहे.

इराणवर आणखी निर्बंध लादले जातील. तसेच आपण लवकरच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा करणार असल्याचे बायडेन यांनी सांगितले.

इस्रायल इराणच्या आण्विक तळांवर हल्ल्याच्या तयारीत, पण अमेरिकेचा विरोध...
इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, "आम्हाला युद्ध नको आहे, पण..."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news