Donald Trump on Nobel Prize : "मी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि रवांडा प्रजासत्ताक यांच्यातील युद्धावर तोडगा काढत एका अद्भुत करारासाठी यशस्वी मध्यस्थी केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवले, सर्बिया आणि कोसोवोमध्ये शांतता आणली. इजिप्त आणि इथिओपियामधील संघर्ष थांबवला आणि मध्य पूर्वेत अब्राहम करार केले. तरीही मला नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नाही, अशा शब्दांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल शांतता पुरस्कारसाठी आपणच कसे योग्य आहोत, यावर पुन्हा एकदा भाष्य केले. यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळावा?, याबाबत चर्चा सुरू असताना त्यांनी केलेल्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
ट्रुथ सोशल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये डाेनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, मी रशिया-युक्रेन किंवा इस्रायल-इराणसारखे मोठे प्रश्न सोडवले आहेत. काँगो आणि रवांडा यांच्यातील करार पूर्ण केला. भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवले, सर्बिया आणि कोसोवोमध्ये शांतता आणली, इजिप्त आणि इथिओपियामधील संघर्ष थांबवला आणि मध्य पूर्वेत अब्राहम करार केले. या जगात शांतता नांदावी यासाठी केलेल्या प्रयत्नांची लोकांना माहिती आहे.
परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्यासोबत मिळून मी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि रवांडा प्रजासत्ताक यांच्यातील युद्धावर तोडगा काढत अद्भुत कराराची यशस्वी मध्यस्थी केली आहे. हे युद्ध अनेक दशकांपासून सुरू होते. हे युद्ध इतिहासातील इतर युद्धांपेक्षाही अधिक भीषण आणि रक्तरंजित ठरले होते. या करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यासाठी रवांडा आणि काँगोचे प्रतिनिधी सोमवारी वॉशिंग्टनमध्ये उपस्थित राहणार आहेत. हा केवळ आफ्रिकेसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. या कार्यासाठी मला नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नाही, हे मला माहीत आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड यांनी मार्चमध्ये संसदेत सांगितले होते की, अमेरिकन एजन्सींनुसार, इराणने अद्याप अणुबॉम्ब बनवण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. याबाबत इराणच्या अण्वस्त्राबाबत बोलताना माध्यमाशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, इराणच्या अण्वस्त्रांबद्दल आमच्या गुप्तचर संस्थेची माहिती चुकीची आहे.