Crude Oil Prices: इराणच्या बंदरांना अमेरिकन नौदलाचा वेढा; जागतिक तेल पुरवठा धोक्यात, पेट्रोल-डिझेल महागणार?

US Navy blockade Iran ports: अमेरिकेच्या नौदलाने इराणमधील बंदरांभोवती नाकेबंदी लागू केल्यानंतर जागतिक तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
Crude Oil Prices
Crude Oil Pricesfile photo
Published on
Updated on

Crude Oil Prices

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या नौदलाने इराणमधील बंदरांभोवती नाकेबंदी लागू केल्यानंतर जागतिक तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पुरवठा साखळी विस्कळीत होण्याच्या भीतीने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. 'असोसिएटेड प्रेस'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

तेलाच्या किमतीत ७ ते ८ टक्क्यांची वाढ

अमेरिकेच्या आक्रमक पवित्र्यानंतर अमेरिकन क्रूड ऑईलच्या किमतीत ८ टक्क्यांनी वाढ होऊन ते १०४.२४ डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचले आहे. दुसरीकडे, ब्रेंट क्रूडचा दरही ७ टक्क्यांनी वधारून १०२.२९ डॉलर्स झाला आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस इराणमधील संघर्ष सुरू होण्यापूर्वी कच्च्या तेलाचे दर ७० डॉलर्सच्या आसपास होते, जे युद्धाच्या काळात ११९ डॉलर्सच्या उच्चांकी पातळीवर गेले होते. दरम्यान, शुक्रवारी होणाऱ्या शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर जून डिलिव्हरीसाठी ब्रेंट क्रूडचे दर ०.८ टक्क्यांनी घसरून ९५.२० डॉलर्सवर स्थिरावले होते.

Crude Oil Prices
Iran US Talks Fail | इराणबरोबर चर्चा फिस्‍कटल्‍यानंतर अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ट्रम्‍प यांचे मोठे विधान, "यापुढे..."

होर्मुझची सामुद्रधुनी आणि नाकेबंदी

जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'होर्मुझच्या सामुद्रधुनी'वर सध्या इराणचे नियंत्रण आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडने स्पष्ट केले आहे की, इराणच्या बंदरांमध्ये येणाऱ्या किंवा तेथून बाहेर पडणाऱ्या सर्व देशांच्या जहाजांवर ही नाकेबंदी निपक्षपातीपणे लागू केली जाईल. मात्र, इराणच्या बंदरांचा वापर न करणाऱ्या आणि केवळ या मार्गावरून प्रवास करणाऱ्या जहाजांना परवानगी दिली जाणार असल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे.

जागतिक पुरवठ्यावर काय परिणाम होणार?

जगातील एकूण तेल व्यापारापैकी सुमारे २० टक्के व्यापार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो. सौदी अरेबिया, इराक, संयुक्त अरब अमिराती, कुवेत आणि स्वतः इराण हे देश याच मार्गावर अवलंबून आहेत. नाकेबंदीमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. जहाजांच्या हालचालींवर निर्बंध आल्यास आणि धोक्याची पातळी वाढल्यास मालवाहतूक खर्च वाढतो, ज्याचा थेट परिणाम ग्राहकांसाठीच्या किमतींवर होतो.

मध्य-पूर्वेतील तेलावर अवलंबून असलेल्या भारतासारख्या देशांवर यामुळे आर्थिक दबाव वाढण्याची शक्यता आहे. मरीन ट्रॅकिंग डेटाच्या माहितीनुसार, युद्धविराम जाहीर झाल्यापासून आतापर्यंत या मार्गावरून ४० हून अधिक व्यावसायिक जहाजांनी प्रवास केला आहे. मात्र, अमेरिकेच्या नव्या निर्बंधांमुळे आगामी काळात ही संख्या घटण्याची चिन्हे आहेत.

Crude Oil Prices
Uganda Muhoozi Kainerugaba: तुर्कीतील सर्वात सुंदर मुलीशी लग्न लावून द्या, नाहीतर..; युगांडाच्या लष्करप्रमुखाची अजब मागणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news