

US Midterm Result 2026 : अमेरिकेत मिडटर्म निवडणुकींचे मतदान झाल्यानंतर सुरूवातीच्या कलांमध्ये डेमोक्रॅट्स आघाडीवर आहेत. प्रोजेक्शनमध्ये डेमोक्रॅटिक्स पक्ष आघाडीवर असून डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ही अग्नीपरीक्षा म्हणून पाहिलं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा २ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर ही निवडणूक होत आहे.
यात काही भारतीय वंशाचे उमेदवार देखील पिछाडीवर आहे. नॉर्थ कॅरोलिनानंतर आता साऊथ कॅरोलिनामध्ये देखील डेमॉक्रेट जिंकताना दिसत आहे. प्रोजेक्शनमध्ये एनी अँड्र्युज दक्षिण कॅरोलिना सीट जिंकत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या जागेवर डेमोक्रॅट जिंकणे हा मध्यावर्ती निवडणुकांमधील एक मोठा उलटफेर म्हणून पाहिलं जात आहे.
बीबीसी पत्रकार डॅनिलय बुश यांनी लिहिल्याप्रमाणे हा अंदाज मतदार रिपब्लिकन पार्टी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर किती नाराज आहेत हे दाखवलतो. दोन दशकांपेक्षाही जास्त काळापासून दक्षिण कॅरोलिना डेमोक्रॅटिक पक्षाचा कोणताही उमेदवार तिथं जिंकला नव्हता. या सीटचे प्रतिनिधित्व रिपब्लिकन लिंडसे ग्राहम यांनी केलं आहे. त्यांचा ७ जुलै रोजी मृत्यू झाला होता.
ओहोयो गव्हर्नर निवडणुकीच्या रेसमध्ये भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी पराभवाच्या छायेत आहेत. अमेरिकेत मतदानानंतर होत असलेल्या काऊंटिंगमध्ये उमेदवार एक्टर, रामास्वामींच्या पुढे आहेत. एक्टन यांना ५०.४७ टक्के मत मिळाले आहेत तर रामास्वामी यांना ४६.२२ टक्के मत मिळाले आहेत. आतापर्यंत ६५ टक्के मतांची मोजणी झाली आहे. सध्याच्या घडीला एमी एक्टन यांनी ४.२४ टक्क्यांच्या अंतराने पुढे आहेत.
भारतीय वंशाचे सुहास सुब्रमण्यम पुन्हा एकदा अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटिव्हची निवडणूक जिंकले आहेत. ४० वर्षाच्या सुब्रमण्यम यांनी वर्जिनियाच्या १० व्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टमधून विजय मिळवला आहे. डेमोक्रॅट उमेदवार असलेल्या सुब्रमण्यम यांनी आपला रिपब्लिकन प्रतिस्पर्धी डेव बेकविथ यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. सुब्रमण्यम यांनी ६१.५ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. तर बेकविथ यांना फक्त ३६.४ टक्के मते मिळाली आहेत.