US Iran Peace Deal |अमेरिका-इराण युद्ध समाप्तीच्या समीप..! 'सिंगल पेज मेमो' तयार; पुढील ४८ तास ठरणार निर्णायक

US Iran Peace Deal | प्रस्तावित आराखड्यात १४ मुद्द्यांचा समावेश असलेला एक पानाचा MOU तयार
US Iran Peace DealUdhari
प्रतिकात्‍मक छायाचित्र.Pudhari
Published on
Updated on

US Iran Peace Deal

वॉशिंग्‍टन : अमेरिका आणि इराण हे युद्ध समाप्तीच्या समीप आले असून 'एक्सिओस'ने (Axios) अमेरिकन अधिकारी आणि संबंधित सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी आणि व्यापक अणू चर्चेसाठी एका पानाचा सामंजस्य करार (MOU) करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.

मुख्य उद्देश तात्काळ युद्धबंदी लागू करणे

रिपोर्टनुसार, प्रस्तावित आराखड्यात १४ मुद्द्यांचा समावेश असलेला एक पानाचा MOU तयार करण्यात आला आहे. याचा मुख्य उद्देश तात्काळ युद्धबंदी लागू करणे आणि पुढील ३० दिवसांत पूर्ण कराराला अंतिम स्‍वरुप देणे असा आहे. या अंतर्गत इराण आपल्या युरेनियम संवर्धन कार्यक्रमाला अल्पकाळासाठी स्थगिती देण्यास तयार झाला आहे. त्या बदल्यात, अमेरिका इराणवरील निर्बंध हटवण्याची आणि इराणची अब्जावधी डॉलर्सची गोठवलेली मालमत्ता मुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करेल. दोन्ही देश 'होर्मुज सामुद्रधुनी'मधील तणाव कमी करण्यासाठी आणि सागरी जलमार्गातील अडथळे दूर करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करतील.

US Iran Peace DealUdhari
Modi Trump phone call | PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा; युद्धबंदीच्या करारानंतर दोन्‍ही नेत्‍यांमध्‍ये प्रथमच संवाद

अनेक महत्त्वाच्या अटी पुढील चर्चेवर अवलंबून

अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, अनेक महत्त्वाच्या अटी पुढील चर्चेवर अवलंबून आहेत. त्‍यामुळे पुन्हा संघर्ष किंवा प्रदीर्घ अनिश्चिततेचा धोका कायम आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज सामुद्रधुनीतील लष्करी हालचाली कमी करण्याचा घेतलेला अलीकडील निर्णय याच राजनैतिक प्रयत्नांचा परिणाम आहे. याचे नेतृत्व अमेरिकन दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर करत आहेत, जे थेट आणि मध्यस्थांच्या माध्यमातून तेहरानच्या संपर्कात आहेत. संबंधित कराराला औपचारिक स्वरूप प्राप्त झाले, तर ती अधिकृतपणे 'युद्ध समाप्तीची' घोषणा असेल आणि पुढील तांत्रिक चर्चा इस्लामाबाद किंवा जिनिव्हा येथे हलवण्यात येतील.

US Iran Peace DealUdhari
US Iran ceasefire |इराणसोबतच्या चर्चेबाबत शुक्रवारी 'गूड न्‍यूज ' मिळू शकते: डोनाल्ड ट्रम्प यांचे सूचक विधान

वादाचा मुख्य मुद्दा काय?

रिपोर्टनुसार, इराणच्या युरेनियम संवर्धनावर घालण्यात येणाऱ्या स्थगितीचा कालावधी हा वादाचा मुख्य विषय आहे. अमेरिका यासाठी २० वर्षांचा कालावधी इच्छित आहे, इराणने ५ वर्षांचा प्रस्ताव दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही पक्ष १२ ते १५ वर्षांच्या दरम्यान तडजोड करू शकतात. इराणने अटींचे उल्लंघन केल्यास स्थगितीचा कालावधी आपोआप वाढेल, अशी यंत्रणाही अमेरिकेला हवी आहे.

US Iran Peace DealUdhari
“इराण फक्त चर्चेसाठीच जिवंत आहे, त्याच्याकडे कोणताही पर्याय नाही,” शांतता चर्चेपूर्वी ट्रम्प यांची धमकी

इराणला द्यावी लागेल लागले अण्वस्त्रे न बनवण्याची स्पष्ट हमी

करारावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर इराणला ३.६७ टक्क्यांपर्यंत मर्यादित संवर्धन पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळू शकते, परंतु त्यांना अण्वस्त्रे न बनवण्याची स्पष्ट हमी द्यावी लागेल. तसेच, इराणच्या भूमिगत अणू प्रकल्पांवर बंदी आणि संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षकांकडून अचानक तपासणी यांसारख्या तरतुदींचाही करारात समावेश असू शकतो. याशिवाय, इराणकडील उच्च समृद्ध युरेनियमचा साठा काढून तो अमेरिकेकडे सोपवण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे.

पुढील ४८ तास ठरणार निर्णायक

पुढील ४८ तास या संपूर्ण प्रक्रियेसाठी अत्यंत निर्णायक मानले जात आहेत, कारण अमेरिका सध्या तेहरानकडून येणाऱ्या प्रतिसादाची वाट पाहत आहे. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटले आहे की, "आम्हाला एकाच दिवसात संपूर्ण करार लिहिण्याची गरज नाही, परंतु आम्ही कोणत्या चर्चेसाठी तयार आहोत. सुरुवातीला कोणत्या सवलती देऊ शकतो, याची मर्यादा स्पष्ट असायला हवी." यावेळी रुबियो यांनी इराणी नेतृत्वाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीकाही केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news