US Iran ceasefire |इराणसोबतच्या चर्चेबाबत शुक्रवारी 'गूड न्‍यूज ' मिळू शकते: डोनाल्ड ट्रम्प यांचे सूचक विधान

US Iran ceasefire |इराणने मात्र पुन्‍हा एकदा ट्रम्‍प यांचे सर्व दावे फेटाळले
US Iran ceasefire
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प.Pudhari
Published on
Updated on

US Iran ceasefire

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी संकेत दिले की, इराणसोबतच्या शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीबाबत शुक्रवारी एखादी "आनंदाची बातमी" समोर येऊ शकते. 'द न्यूयॉर्क पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, पुढील ३६ ते ७२ तासांत ही चर्चा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

"ट्रम्प पुन्हा खोटे बोलले" : इराणचा नकार

, इराणने मात्र ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या युद्धविराम विस्ताराबाबत (Ceasefire Extension) अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'शी संबंधित असलेल्या 'तस्नीम न्यूज' या वृत्तसंस्थेने 'X' वर पोस्ट करत ट्रम्प यांचे दावे फेटाळून लावले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, "ट्रम्प यांनी पुन्हा एकदा खोटे विधान केले आहे. इराणने सध्या शुक्रवारी कोणतीही चर्चा करण्याचा निर्णय घेतलेला नाही."

US Iran ceasefire
Iran US Conflict: चर्चा फिसकटल्यानंतर इराणचे शिष्टमंडळ जीव मुठीत घेऊन पोहचलं तेहरानमध्ये; इस्लामाबादमध्ये नेमकं काय घडलं?

पाकिस्तानच्या मध्यस्थीमुळे रणनीतीत बदल?

इराणने दिलेली मुदत संपल्यानंतरही कोणतीही अनुचित घटना न घडल्याने ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेने पहिल्यांदाच इराणला पुढील पाऊल उचलण्यासाठी कोणतीही ठराविक डेडलाईन दिलेली नाही. ट्रम्प यांनी या धोरणात्मक बदलाचे श्रेय पाकिस्तानच्या नेतृत्वाशी केलेल्या चर्चेला दिले आहे.

US Iran ceasefire
Ali Khamenei Funeral Update | अयातुल्ला अली खामेनींच्या अंत्यसंस्काराला इराण का घाबरतोय?

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर कोणती पोस्‍ट केली?

"इराणचे सरकार सध्या विखुरलेले आहे, जे अपेक्षितच होते. पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या विनंतीवरून, आम्ही इराणवरील आमचा हल्ला तोपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, जोपर्यंत त्यांचे नेते आणि प्रतिनिधी एक संयुक्त प्रस्ताव सादर करत नाहीत.मी आमच्या लष्कराला नाकेबंदी सुरू ठेवण्याचे आणि इतर सर्व बाबतीत सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. जोपर्यंत इराण आपला प्रस्ताव सादर करत नाही, तोपर्यंत युद्धविराम लागू राहील."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news