US Iran War Timeline 2026: खामेनींचा मृत्यू, हजारहून अधिक नागरिकांचा जीव घेणाऱ्या युद्धात 39 दिवसांत काय घडलं?

US Iran War Timeline 2026
US Iran War Timeline 2026pudhari
Published on
Updated on

US Iran War Timeline 2026: गेल्या पाच आठवड्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका-इराण युद्धाला अखेर ३९ व्या दिवशी पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत १५ दिवसांच्या शस्त्रसंधीची घोषणा केली असून, इराणच्या सुरक्षा परिषदेनेही याला दुजोरा दिला आहे. ट्रम्प यांनी एका वर्षात दुसऱ्यांदा अमेरिकेला इराणसोबत थेट लष्करी संघर्षात ओढले होते. या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून इराण आणि लेबनॉनमध्ये हजारो निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे.

इराणने इस्त्रायल आणि अमेरिका या दोन्ही लष्करी शक्तींची समर्थपणे सामना केला. अवघ्या काही दिवसात इराणला गुडघ्यावर आणण्याची भाषा करणाऱ्या अमेरिकेला इराणने ३९ दिवस झुंजवलं अन् शेवटी आपल्या अटी शर्तींवरच शस्त्रसंधी करण्यास भाग पाडलं.

US Iran War Timeline 2026
Iran US Israel War: इराण युद्धात अमेरिकेनं तब्बल १६ लढाऊ एअरक्राफ्ट गमावली... शेखी मिरवणारे ट्रम्प माघार घेणार?

युद्धाचा घटनाक्रम आणि ठळक घडामोडी (Timeline)

२८ फेब्रुवारी: अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर भीषण हल्ला. तेहरानमधील सरकारी आस्थापने आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले. यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक उच्चपदस्थ लष्करी अधिकारी ठार झाले. याच दिवशी अमेरिकेच्या चुकीच्या निशाण्यामुळे एका प्राथमिक शाळेवर झालेल्या हल्ल्यात १७५ जणांचा मृत्यू झाला, ज्यात बहुतांश लहान मुले होती.

१ मार्च: इराणच्या ड्रोन हल्ल्यात कुवेतमध्ये ६ अमेरिकन सैनिक ठार झाले. युद्धात अमेरिकन सैनिकांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना होती. दरम्यान, हिजबुल्लाहने लेबनॉनमधून इस्रायलवर रॉकेट डागून युद्धात उडी घेतली.

८ मार्च: अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मोजताबा खामेनी (५६) यांची इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली. ट्रम्प यांनी ही नियुक्ती 'अस्वीकार्य' असल्याचे म्हटले.

US Iran War Timeline 2026
Strait of Hormuz Ownership History: ज्या होर्मुझसाठी अमेरिका-इराण भिडले त्याचा मूळ मालक कोण; भारताचं काय कनेक्शन आहे?

११ मार्च: इराणने 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' (Strait of Hormuz) मध्ये हल्ले तीव्र केले. किमान तीन जहाजांवर हल्ले करण्यात आले, ज्यामुळे जागतिक बाजारात तेलाचे दर गगनाला भिडले.

१३ मार्च: अमेरिकेने इराणच्या 'खार्ग बेटावर' मोठा बॉम्ब हल्ला केला. हे बेट इराणच्या ९० टक्के तेल निर्यातीसाठी महत्त्वाचे केंद्र आहे.

१७ मार्च: इस्रायलने इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख अली लारीजानी आणि 'बासिज' मिलिशियाचे प्रमुख घोलमरेझा सुलेमानी यांना ठार केले. खामेनींच्या मृत्यूनंतर हा इराणसाठी सर्वात मोठा धक्का होता.

US Iran War Timeline 2026
Iran Uranium Heist: पायलट रेस्क्यू मिशन हा तर बनाव, त्याच्या आडून अमेरिकेने आखला होता मोठा डाव... इराणचा धक्कादायक दावा

१८ मार्च: इराणने कतारमधील जगातील सर्वात मोठ्या गॅस एक्सपोर्ट प्लांटवर (Ras Laffan) हल्ला केला, तर इस्रायलने इराणच्या 'साउथ पार्स' गॅस फिल्डवर प्रहार केला.

२३ मार्च: राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी प्रथमच अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध थांबवण्यासाठी राजनैतिक चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले.

३ एप्रिल: इराणने अमेरिकेचे F-15E फायटर जेट पाडले. एका पायलटची सुटका करण्यात आली, तर दुसऱ्या एअरमनसाठी इराणमध्ये ३०० किमी आत घुसून अमेरिकेने धाडसी रेस्क्यू मिशन राबवले.

७ एप्रिल: ३९ दिवसांच्या संघर्षानंतर अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी १५ दिवसांच्या शस्त्रसंधीची (Cease-fire) घोषणा केली. इराणने याला आपला 'विजय' असल्याचे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news