US Iran conflict: सलग ६ व्या रात्री अमेरिकेचा इराणवर थरकाप उडवणारा हल्ला; संपूर्ण आशियाई बाजाराला मोठा फटका

अमेरिकेकडून इराणवर सलग सहाव्या रात्रीही भीषण आणि मोठे हल्ले सुरूच आहेत. वाढत्या लष्करी संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
US Iran conflict
US Iran conflictfile photo
Published on
Updated on

US Iran conflict

नवी दिल्ली: अमेरिकेकडून इराणवर सलग सहाव्या रात्रीही भीषण आणि मोठे हल्ले सुरूच आहेत. दक्षिण इराणमधील बंदर अब्बास येथील वीज प्रकल्प आणि रेल्वे स्टेशन यांसारख्या नागरी पायाभूत सुविधांना या हल्ल्यांत लक्ष्य करण्यात आले. तर दुसरीकडे बहरीन येथील लष्करी तळावर असलेल्या अमेरिकन विमानांना लक्ष्य केल्याचा दावा इराणी लष्कराने केला आहे.

कुवेत हाय अलर्टवर

कुवेतच्या लष्कराने त्यांच्यावर झालेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. "हॉर्मुझची सामुद्रधुनी आता कधीही युद्धपूर्व स्थितीसारखी पूर्ववत होणार नाही," असा इशारा इराणच्या लष्करी प्रवक्त्याने दिला आहे. इराणवर निर्बंध लादण्यासाठी आणि त्याची नाकेबंदी करण्यासाठी अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या सैनिकांनी ओमानच्या आखातात एका जहाजावर ताबा मिळवला आहे.

US Iran conflict
Monsoon Oil Price Impact | अर्थचक्राला ‌‘इंधन‌’

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ; आशियाई शेअर बाजारात घसरण

अमेरिका आणि इराणमधील वाढत्या लष्करी संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड वायदा १ टक्क्यांहून अधिक वाढून प्रति बॅरल $८५ च्या पार गेला आहे.अमेरिकेचे तेल वायदा देखील वाढून प्रति बॅरल जवळपास $८० वर पोहोचले असून, मागील सत्रातील झालेली घसरण भरून निघाली आहे. दोन्ही बेंचमार्क करारांमध्ये या चालू आठवड्यात जवळपास १२ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

शेअर बाजाराला मोठा फटका

आशियाई शेअर बाजारात आज सकाळी मोठी घसरण पाहायला मिळाली; जपानचा मुख्य निर्देशांक 'निक्केई २२५' ३ टक्क्यांहून अधिक कोसळला.

ट्रम्प यांचा चीनवर गंभीर आरोप

अमेरिकेच्या निवडणूक डेटाचा इतिहासातील सर्वात मोठा गैरवापर चीनने केला असल्याचा खळबळजनक आरोप ट्रम्प यांनी केला आहे. एका जाहीर भाषणात, त्यांनी निवडणुकीत हस्तक्षेप आणि हेराफेरी करणाऱ्यांवर गुन्हेगारी खटले चालवण्याचे आदेश फेडरल गव्हर्नमेंटला दिले आहेत. तसेच आपले भाषण प्रसारित करण्यास नकार देणाऱ्या आघाडीच्या टीव्ही नेटवर्कचे ब्रॉडकास्टिंग लायसन्स रद्द करण्याचे निर्देश ट्रम्प यांनी दिले आहेत.

US Iran conflict
Pakistan Army Chief Asim Munir :"सैन्य सोडा आणि निवडणूक लढवून दाखवा"; पाकिस्तानी खासदाराचे लष्करप्रमुख मुनीर यांना थेट आव्हान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news