US Iran ceasefire talks |अमेरिकेबरोबरची चर्चा का फिस्कटली? इराणने सांगितले कारण

US Iran ceasefire talks | मध्यपूर्वेतील युद्धविरामाचा पेच कायम
US-Iran ceasefire talks
प्रातिनिधिक छायाचित्र. file Photo.
Published on
Updated on

US-Iran ceasefire talks

तेहरान : युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानमध्ये सुरू असलेली अमेरिका आणि इराणमधील चर्चा फिस्‍कटली आहे. अमेरिकेने लादलेल्या ‘अवाजवी अटींमुळेच हा पेच निर्माण झाल्याचा दावा इराणने आज (दि.१२) केला आहे. तर इराणने अमेरिकेच्या अटी फेटाळून लावल्याने ही बाबत अमेरिकेपेक्षा इराणसाठी अधिक चिंताजनक घंटा असल्‍याचा अप्रत्‍यक्ष इशारा अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वान्स यांनी दिला आहे.

२१ तासांची प्रदीर्घ चर्चा निष्फळ

इराणची सरकारी वृत्तसंस्था ‘आयआरआयबी’ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणी शिष्टमंडळाने राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी सलग २१ तास सखोल चर्चा केली. इराणने अनेक सकारात्मक पुढाकार घेतले, मात्र अमेरिकेच्या हेकेखोरपणामुळे चर्चेत प्रगती होऊ शकली नाही आणि ही चर्चा कोणत्याही निर्णयाविना संपली.

US-Iran ceasefire talks
US-Israel Iran War | तात्पुरती युद्धबंदी!

अमेरिकेच्‍या ‘अवाजवी अटींमुळेच पेच कायम : इराणाचा दावा

इराणच्या ‘तस्नीम’ या निम-सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, अमेरिकेने अशा काही सवलती मागितल्या होत्या ज्या ते युद्धभूमीवर मिळवू शकले नाहीत. यामध्ये जागतिक तेल पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) क्षेत्रावर नियंत्रण मिळवणे आणि अण्वस्त्र सामग्री हटवणे अशा अटींचा समावेश होता.

US-Iran ceasefire talks
Iran Trump War | ट्रम्पच्या नव्हे, आमच्या अटी पूर्ण झाल्या तरच युद्धविराम!

अमेरिकेचा निर्वाणीचा इशारा

अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वान्स यांनी इस्लामाबाद सोडताना पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "आम्ही आमचा अंतिम आणि सर्वोत्तम प्रस्ताव इराणसमोर ठेवला आहे. आता ते स्वीकारायचा की नाही, हे त्यांच्यावर अवलंबून आहे. इराणने अण्वस्त्रे तयार न करण्याच्या अटीसह इतर महत्त्वाच्या अटी मान्य करण्यास नकार दिला आहे. इराण अण्वस्त्रे मिळवणार नाही किंवा त्यासाठी आवश्यक साधने विकसित करणार नाही, आम्हाला हवे आहे. हेच राष्ट्राध्यक्षांचे मुख्य ध्येय आहे. दुर्दैवाने करार होऊ शकला नाही; पण ही बाब अमेरिकेपेक्षा इराणसाठी अधिक चिंताजनक आहे," असा इशाराही वान्‍स यांनी दिला आहे.

US-Iran ceasefire talks
Strait of Hormuz Tensions | 'होर्मुझ'मध्ये युद्धनौका तैनातीबाबत अमेरिकेशी कोणतीही चर्चा नाही; भारताची स्‍पष्‍टोक्‍ती

अमेरिका आणि इराणमध्‍ये सर्वोच्च स्तरावरील पहिली भेट

१९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर अमेरिका आणि इराणमध्ये झालेली ही सर्वोच्च स्तरावरील आणि गेल्या दशकातील पहिलीच थेट चर्चा होती. अमेरिकेच्या वतीने जे.डी. वान्स, विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर उपस्थित होते. तर ७१ सदस्यीय इराणी शिष्टमंडळाचे नेतृत्व संसदेचे सभापती मोहम्मद बाकर कालीबाफ आणि परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी केले.मध्यस्थांऐवजी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समोरासमोर बसून चर्चा केली.

US-Iran ceasefire talks
Oil prices fall: ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर्सच्या खाली; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

मध्यपूर्वेतील युद्धविरामाचा पेच कायम

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याने या युद्धाचा भडका उडाला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी आणि इतर ज्येष्ठ नेते मारले गेले. प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली होती. आता उभय देशांमधील चर्चा फिस्‍कटल्‍याने मध्यपूर्वेतील युद्धविरामाचा पेच कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news