India Oil Import Ban: भारताला मोठा झटका! रशिया-इराणकडून तेल खरेदीवर अमेरिकेचा ब्रेक; पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार?

India Oil Import Ban: अमेरिकेने रशिया आणि इराणकडून तेल खरेदीसाठी दिलेली सूट वाढवण्यास नकार दिला आहे. यामुळे भारतासारख्या देशांना स्वस्त तेल मिळणे कठीण होणार आहे.
India Oil Import Ban
India Oil Import BanPudhari
Published on
Updated on

India Oil Import Ban: जागतिक पातळीवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक मोठी आर्थिक घडामोड समोर आली आहे. आता भारताला रशिया आणि इराणकडून तेल खरेदी करणे कठीण होणार आहे, कारण अमेरिकेने दिलेली तात्पुरती सूट संपली आहे.

अमेरिकेचा निर्णय

अमेरिकेचे वित्तमंत्री स्कॉट बेसेंट यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, रशिया आणि इराणच्या तेलासाठी दिलेली विशेष परवानगी (लायसन्स) आता वाढवली जाणार नाही. म्हणजेच, यापुढे या देशांकडून तेल खरेदी करण्यावर पुन्हा निर्बंध लागू होणार आहेत.

आधी काय सूट होती?

मिडल ईस्टमधील संघर्षामुळे जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला होता. तेव्हा अमेरिकेने काही देशांना ज्यात भारताचाही समावेश होता तात्पुरती 30 दिवसांची सूट दिली होती. या सूटमुळे आधीच जहाजांवर लोड केलेलं तेल खरेदी करण्याची परवानगी मिळाली होती.

India Oil Import Ban
Engineer Salary: फक्त 9 रुपये पगारवाढ! इंजिनिअर संतापला, म्हणाला, गुलामासारखं काम करतोय... सोशल मीडियावर मांडली व्यथा

आता मुदत संपली

रशियन तेलासाठी दिलेली सूट 11 एप्रिललाच संपली आहे. तर इराणच्या तेलासाठीची सूट 19 एप्रिलला संपणार आहे. अमेरिकेच्या निर्णयामुळे आता नवीन व्यवहारांवर मर्यादा येणार आहेत.

भारतावर काय परिणाम?

भारत हा जगातील मोठ्या तेल आयातदार देशांपैकी एक आहे. रशिया आणि इराणकडून स्वस्त दरात तेल मिळत असल्यामुळे भारताला फायदा होत होता.

आता ही सोय नसल्याने:

  • तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे

  • आयात खर्च वाढू शकतो

  • महागाईवरही परिणाम होऊ शकतो

India Oil Import Ban
MGNREGA No Wage Hike: मनरेगाच्या कामगारांना मोठा झटका; यावर्षी वेतनवाढ होणार नाही, काय आहे कारण?

जागतिक बाजारावर परिणाम

या निर्णयाचा परिणाम केवळ भारतावर नाही, तर संपूर्ण जगावर होणार आहे. तेलाचा पुरवठा कमी झाला तर जागतिक बाजारात किंमती पुन्हा वाढू शकतात.

थोडक्यात अमेरिकेच्या निर्णयामुळे भारतासाठी तेल खरेदीचं समीकरण बदलणार आहे.
स्वस्त तेलाचा पर्याय कमी होणार असून, आर्थिक दबाव वाढण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news