Donald Trump On Pahalgam | पहलगाम हल्ल्यानंतर ट्रम्प यांची भावनिक पोस्ट; म्हणाले दहशतवादाविरोधात...

Donald Trump On Pahalgam | अमेरिका-भारत संबंध दृढ; ट्रम्प यांची पहलगाम हल्ल्यावर ठाम भूमिका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प | Donald Trump On Pahalgam
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प | Donald Trump On Pahalgam Attack Online Pudhari
Published on
Updated on

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रूथ ’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या हल्ल्याबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

(Donald Trump On Pahalgam)

Donald Trump Truth Social Post On Pahalgam  Attack
Donald Trump Truth Social Post On Pahalgam Attack

दरम्यान, ट्रम्प म्हणाले, “काश्मीरमधून अत्यंत दु:खद अशी बातमी समोर आली आहे. दहशतवादाविरोधातील या लढाईमध्ये अमेरिका भारतासोबत ठामपणे उभी आहे. मृतांच्या आत्म्याला शांती मिळो आणि जखमी नागरिक लवकर बरे होवोत, अशी आम्ही प्रार्थना करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील जनतेप्रती आम्हाला मनापासून सहानुभूती आहे.”

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील हा हल्ला दहशतवादी असल्याचे स्पष्ट केले असून, "हल्ला करणाऱ्यांना सोडले जाणार नाही," असा इशारा दिला आहे.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “अलीकडच्या वर्षांमध्ये सामान्य पर्यटकांवर करण्यात आलेला हा सर्वांत मोठा आणि धक्कादायक हल्ला आहे.”

या हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी झाले असून, सध्या त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून, सुरक्षा यंत्रणांना अलर्ट ठेवण्यात आले आहे.

अनेक पर्यटकांनी आपल्या काश्मीर टूर रद्द केल्याची माहिती समोर येत आहे.

या संपूर्ण परिसरात गस्त वाढवण्यात आली असून, संभाव्य संशयितांच्या शोधासाठी शोधमोहीम सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडूनही या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, लवकरात लवकर दोषींना पकडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असतानाच, पर्यटन व्यवसायिकांमध्येही चिंता वाढली आहे. अनेक पर्यटकांनी आपल्या काश्मीर टूर रद्द केल्याची माहिती समोर येत आहे. सरकारकडून सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे, मात्र या घटनेचा दीर्घकालीन परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news