[Explainer] workplace mental health crisis : ऑफिसचा ताण ठरतोय जीवघेणा, दरवर्षी ८.४० लाख मृत्यू; काय सांगतो UN चा अहवाल?

मानसिक तणाव कामगारांच्या आरोग्यापुढील सर्वात मोठे संकट
workplace mental health crisis
प्रतीकात्मक छायाचित्र. AI-generated image
Published on
Updated on

workplace mental health crisis

जिनिव्हा : संगणक युगानंतर सर्वच क्षेत्रांतील कामाचे स्वरूप बदलले. या बदलाचा वेग प्रचंड, त्याचबरोबर मानसिक ताणही कैक पटीने वाढला. कामाचे दीर्घ तास, नोकरीची असुरक्षितता आणि कामाच्या ठिकाणी असणारा मानसिक त्रास याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होऊ लागला आहे. ऑफिसमधील कामाच्या अतिरिक्त ताणामुळे दरवर्षी तब्बल ८,४०,००० हून अधिक लोकांचा मृत्यू होतो, अशी धक्कादायक आकडेवारी संयुक्त राष्ट्रांची एक संस्था असलेल्या 'आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या' (ILO) नवीन अहवालातून समोर आली आहे.

कामगारांना हृदयविकारासह मानसिक आजारांचा विळखा

आधुनिक जगात कामाच्या ठिकाणी असणारा तणाव हा अपरिहार्य भागच बनला आहे. मात्र, आता याच तणावाचा गंभीर परिणाम कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे. संयुक्त राष्ट्रांची संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, दरवर्षी ८.४ लाखांहून अधिक लोक कामाशी संबंधित मानसिक आणि सामाजिक जोखमींमुळे उद्भवणाऱ्या आजारांनी जीव गमावतात. यामध्ये प्रामुख्याने हृदयविकार आणि मानसिक आजारांचा (उदा. नैराश्य, आत्महत्या) समावेश आहे.

workplace mental health crisis
India economy Middle East conflict | भारतीय अर्थव्यवस्थेला मध्यपूर्वेतील संघर्षाचा धोका

मानसिक ताण कामगारांच्या आरोग्यापुढील सर्वात मोठे संकट

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) अधिकारी मनल अझी म्हणतात, "आजच्या काळात कामाच्या ठिकाणचा मानसिक तणाव हे कामगारांच्या आरोग्यापुढील सर्वात मोठे संकट बनले आहे."

जागतिक जीडीपीला १.३७ टक्के नुकसान

कामाच्या ठिकाणी असणाऱ्या अतिताणाचा परिणाम कामगारांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो. चुकीच्या कामाच्या पद्धतींमुळे दरवर्षी सुमारे ४.५ कोटी आजारपणामुळे वाया गेलेली आरोग्यदायी वर्षे (DALYs) वाया जातात. याचा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत असून, दरवर्षी जागतिक जीडीपीच्या (GDP) १.३७% इतके नुकसान होत आहे.

workplace mental health crisis
AI Prediction: पुढील पाच वर्षांत IT सेवा बंद होणार; AI समिटआधी विनोद खोसला यांचा मोठा इशारा, नोकऱ्यांच काय होणार?

जगभरातील कामाचे सुमारे १२ अब्ज दिवस वाया

कामाच्या ठिकाणी असणाऱ्या अतिताणामुळे नैराश्य आणि चिंता निर्माण होते. कामगाराच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या भयावह परिणामामुळे दरवर्षी जगभरातील कामाचे सुमारे १२ अब्ज दिवस वाया जातात, अशीही धक्कादायक माहिती या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

workplace mental health crisis
Livspace Layoffs: AI चा मोठा धक्का! Livspace ने 1,000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ; को-फाउंडरचाही राजीनामा

ताण व्यवस्थापनातील चुकीमुळे आरोग्याच्या समस्या

कामाचा ताण हाताळण्यासाठी अनेकजण धूम्रपान, मद्यपान, अति खाणे किंवा शारीरिक हालचाल कमी करणे यांसारख्या सवयींकडे वळतात. यामुळे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि इतर जुनाट आजार बळावतात, याचा परिणाम थेट उत्पादकतेवर होतो.

workplace mental health crisis
Viral News Job Offer Rejects: सिनिअर पोस्ट अन् ४७ लाखांचं पॅकेज नाकारलं... वनेश माळीची नम्र नकाराची 'ती' पोस्ट चर्चेत

कोणत्या कारणांमुळे तणाव वाढतोय? कोणते विकार होतात?

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात केवळ ताणतणाव वाढतोय याच्या आकडेवारीवर प्रकाशझोत टाकला नसून, कोणत्या कारणांमुळे तणाव वाढतो आणि कोणते विकार होतात याबाबतही अहवालात सविस्‍तर माहिती दिली आहे. ती खालीलप्रमाणे...

  1. कामाचे वाढीव तास : जगात ३५% कामगार आठवड्याला ४८ तासांपेक्षा जास्त काम करतात. आठवड्याला ५५ किंवा त्यापेक्षा जास्त तास काम केल्यास अर्धांगवायूचा धोका ३५% आणि हृदयविकाराचा धोका १७% वाढतो.

  2. मानसिक छळ : जगभरातील २३% कामगारांनी त्यांच्या कामाच्या आयुष्यात मानसिक छळ किंवा शारीरिक हिंसेचा अनुभव घेतला आहे. यामध्ये मानसिक छळाला सामोरे जाण्याचे प्रमाण १८ टक्के आहे.

  3. नोकरीची असुरक्षितता : कामाची शाश्वती नसणे आणि कामाच्या बदल्यात मिळणारा मोबदला किंवा सन्मान यात तफावत.

workplace mental health crisis
IT Salary 2026: TCS, Infosysमध्ये इंजिनिअर्सना कमी पगार का मिळतोय? एक्सपर्ट्सनी सांगितलं धक्कादायक कारण

उत्पादकता वाढवण्यासाठी मानसिक-शारीरिक आरोग्य जपणे आवश्यक

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) अधिकारी मनल अझी यांनी स्पष्ट केले आहे की, "कामगारांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपणे हे केवळ त्यांच्या वैयक्तिक हिताचे नसून, उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शाश्वत आर्थिक विकासासाठी देखील आवश्यक आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news