

UK universities पाकिस्तान आणि बांगलादेशमधील उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थी व्हिसाचा गैरवापर करतील अशी चिंता इंग्लडमधील विद्यापीठांना सतावत आहे. यावर उपाय म्हणून पाकिस्तान आणि बांगलादेशमधील अर्जदारांना प्रवेश देणे कमी केले आहे. गृह मंत्रालयानेही या शैक्षणिक व्हिसावर कठोर नियम लावले आहेत यामुळे आता विद्यापीठ या देशातील विद्यार्थ्यांना व्हिसा देताना विचार करत आहे.
इंग्लडमधील किमान नऊ उच्च शिक्षण संस्थांनी "हाय रिस्क" देशांमधून विद्यार्थ्यांची भरती मर्यादित केली आहे, या देशातील अर्जदार विद्यार्थी खरोखरच उच्च शिक्षणासाठी येतात की इतर कारणांसाठी याची खात्री करणे खूप जिकीरीचे होत आहे. तसेच विद्यापीठांवर खरे आणि पात्र विद्यार्थीच प्रवेश घेत आहेत याची खात्री करण्यासाठी वाढता दबाव आहे.
याबाबात विद्यापीठांकडे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडून केलेल्या अर्जांमध्ये वाढ झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर इंग्लडच्या देशाच्या बॉर्डर सिक्युरिटी मंत्री डेम एंजेला ईगल इशारा दिला की व्हिसा प्रणालीचा वापर ब्रिटनमध्ये स्थायिक होण्यासाठी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यापीठांनी अर्जदारांना प्रवेश देण्यात हात आखडता घेतला आहे.
या विद्यापिठांनी नाकारले प्रवेश
युनिव्हर्सिटी ऑफ चेस्टरने पाकिस्तानमध्ये व्हिसा नाकारण्याच्या प्रमाणात अचानक आणि अनपेक्षित वाढ झाल्याचे सांगून ने पाकिस्तानमधून होणारी विद्यार्थ्यांची भरती सप्टेबंर 2026 पर्यंत स्थगित केली आहे.तर युनिव्हर्सिटी ऑफ वूल्वरहॅम्प्टन या विद्यापीठाने पाकिस्तान आणि बांगलादेशमधून पदवी आलेले अर्ज स्वीकारने बंद केले आहे. त्याचप्रमाणे युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडननेही पाकिस्तानमधून विद्यार्थ्यांची भरती स्थगित केली आहे. त्याचबरोर संडरलँड आणि कोव्हेंट्री या विद्यापीठांनी पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही देशांमधून होणारी भरती स्थगित केली आहे.