Red Fort blast case | पाकिस्तान, बांगला देशातून पदवी घेतलेल्या डॉक्टरांचीही चौकशी

Red Fort blast case
Red Fort blast case | पाकिस्तान, बांगला देशातून पदवी घेतलेल्या डॉक्टरांचीही चौकशी
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : राजधानी दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात आता दिल्ली पोलिसांनी आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. यांतर्गत दिल्लीतील सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस बजावून अशा डॉक्टरांचा तपशील मागवण्यात आला आहे, ज्यांनी पाकिस्तान, बांगला देश, संयुक्त अरब अमिरात आणि चीनमधून एमबीबीएसची पदवी घेतली आहे आणि राजधानीत वैद्यकीय व्यवसाय (प्रॅक्टिस) करत आहेत. दरम्यान, तपास यंत्रणा ‘एनआयए’देखील आत्मघाती हल्लेखोर उमर नबी आणि अल फलाह विद्यापीठाच्या डॉक्टरमधील संबंधांची अधिक चौकशी करत आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने अल फलाह विद्यापीठातील 30 डॉक्टरांचे जबाब नोंदवले आहेत. उमर आणि त्याच्या वागणुकीबद्दल डॉक्टरांची चौकशी करण्यात आली. त्याच्या सहकारी डॉक्टरांनी सांगितले की, उमरची वागणूक खूप उद्धट होती आणि तो आपल्या खोलीत फक्त काही निवडक लोकांनाच येऊ देत असे. याशिवाय, 26 नोव्हेंबर रोजी दिल्ली स्फोट प्रकरणात एनआयएने आरोपी शोएबला 10 दिवसांच्या कोठडीत घेतले आहे. शोएबला फरिदाबादमधून अटक करण्यात आली होती.

सर्व संशयितांची कसून चौकशी होणार

यापूर्वी एनआयएने उमरच्या सहा जवळच्या साथीदारांना अटक केली होती. आत्मघाती बॉम्बस्फोटाशी संबंधित सर्व संभाव्य पुरावे आणि संशयितांचा शोध घेण्यासाठी अनेक राज्यांमध्ये छापे टाकले जात असल्याचे तपास यंत्रणेने म्हटले आहे. या हल्ल्यामागे कार्यरत असलेल्या संपूर्ण दहशतवादी नेटवर्कमधील सर्व सदस्यांना पकडणे हे एनआयएचे उद्दिष्ट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news