US Iran Peace Talks | युद्धविरामाच्‍या 'संभाव्‍य करारा'साठीची बैठक कोणत्याही 'अंतिम निर्णया'शिवाय संपली!

राष्‍ट्राध्‍यक्ष ट्रम्‍प यांची वरिष्‍ठ अधिकार्‍यांसमवेत सिच्युएशन रूममधील बैठक
US Iran peace talks
प्रातिनिधिक छायाचित्र.Pudhari
Published on
Updated on

US Iran peace talks

वॉशिंग्‍टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार दावा केला आहे की, अमेरिका आणि इराण एका कराराच्या जवळ पोहोचले आहेत. तथापि, शुक्रवारी (दि.२९) युद्धविरामाच्‍या 'संभाव्‍य करारा'साठीची व्हाईट हाऊसच्या 'सिच्युएशन रूम'मध्ये बैठक कोणत्‍याही अंतिम निर्णयाशिवाय संपली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय - व्हाईट हाऊसमध्ये - त्यांच्या सल्लागारांची भेट घेतली; परंतु इराणसोबत शस्त्रसंधी वाढवण्याच्या आणि होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याच्या प्रस्तावित कराराबाबत त्यांनी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, इराणनेही म्हटले आहे की, हा करार अद्याप अंतिम झालेला नाही.

अमेरिका आपल्‍या मागण्‍यांवर ठाम

या बैठकीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'न्यूयॉर्क टाईम्स'ला सांगितले की, करार अगदी जवळ आला असला तरी, इराणी नागरिकांसाठीचा गोठवलेला निधी खुला करण्यासह इतर अनेक मुद्द्यांवर अजूनही चर्चा सुरू आहे. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने निवेदनात म्हटले आहे की, "सिच्युएशन रूममधील बैठक संपली असून, ती सुमारे दोन तास चालली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे केवळ अमेरिकेच्या हिताचा आणि त्यांच्या अटींचे (Red lines) पालन करणाराच करार करतील. इराण कधीही अणुशस्त्रे तयार करू शकत नाही."

US Iran peace talks
US Iran Ceasefire Talks | 'समृद्ध युरेनियम इराणमध्येच राहणार'; मोजताबा खामेनी यांनी अमेरिकेची मुख्य मागणी फेटाळली

काय म्‍हणाले होते डोनाल्‍ड ट्रम्‍प?

बैठकीपूर्वी ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' पोस्टमध्ये म्‍हटलं होतं की, संभाव्य युद्धबंदीबाबतपुढील पाऊल कसे टाकायचे याचा 'अंतिम निर्णय' घेण्यासाठी आपण बैठकीला जात आहेत. इराण हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये पेरलेले सुरुंग साफ करेल, अमेरिका आपली सागरी नाकेबंदी उठवेल. जहाजांची वाहतूक सुरू होईल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला होता. तसेच इराणचे अत्यंत समृद्ध युरेनियम (Highly enriched uranium) शोधून काढून नष्ट केले जाईल, असेही ते म्‍हणाले होते.

US Iran peace talks
Iran vs USA Conflict 2026 | 'आखातात अमेरिकेला स्थान नाही, असेल तर फक्त समुद्राच्या तळाशी'; इराणचे खामेनी कडाडले

इराणची मागणी काय ?

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते एस्माईल बघाई यांनी स्‍पष्‍ट केले की, अमेरिकेसोबत अद्याप कोणताही करार अंतिम झालेला नाही. दोन्ही बाजूंमध्ये संदेशांची देवाणघेवाण सुरू आहे. 'आयआरआयबी टीव्ही' (IRIB TV) या सरकारी वाहिनीला दिलेल्या टेलिफोनिक मुलाखतीत बघाई म्हणाले की, सध्याच्या वाटाघाटींमध्ये इराणचा मुख्य भर "युद्ध थांबवण्यावर" आहे. ते म्हणाले, "या टप्प्यावर इराणच्या युरेनियम समृद्धीकरणाच्या किंवा समृद्ध युरेनियमच्या तपशीलांवर आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबत बोलताना बघाई म्हणाले की, या सामुद्रधुनीचे भविष्यातील व्यवस्थापन केवळ इराण आणि ओमानशी संबंधित आहे," याचा पुन्‍नरुच्‍चारही त्‍यांनी केला.

US Iran peace talks
US-Iran Israel War|इस्रायल नष्ट होईपर्यंत मध्य पूर्वेत शांतता नांदणार नाही : इराणने युद्धाच्या आगीत ओतले तेल

अमेरिकेच्‍या प्रमुख्‍य मागण्‍या कोणत्‍या ?

  • इराणने युरेनियम समृद्ध करणे थांबवावे आणि आपले समृद्ध युरेनियम दुसऱ्या देशाकडे सुपूर्द करावे.

  • हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करावी. तसेच ३० दिवसांच्या आत तेथील सुरुंग हटविण्‍यात यावेत.

इराणच्या मुख्य वार्ताकाराने अमेरिकेच्या आश्वासनांवर शंका व्यक्त करत म्हटले आहे की, तेहरान वॉशिंग्टनच्या केवळ शब्दांवर नाही, तर ठोस कृतीवरच विश्वास ठेवेल.

US Iran peace talks
Iran USA 60 Day MoU: इराण - अमेरिकेत ६० दिवसांची 'जुगाड डील'... याचा भारतावर काय परिणाम होणार?

युद्धबंदीचे उल्लंघन

८ एप्रिल रोजी मध्यपूर्वेमध्ये युद्धबंदी लागू झाली होती, नेमक्या त्याच वेळी ट्रम्प यांना इराणविरुद्धचे युद्ध सुरू ठेवण्यासाठी काँग्रेसच्या (संसदेच्या) मंजुरीची आवश्यकता आहे का, यासारख्या प्रश्नांना सामोरे जावे लागत होते.परंतु, अगदी याच आठवड्यात अमेरिका आणि इराणने एकमेकांवर सामुद्रधुनीच्या आसपास युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेने इराणच्या दक्षिणेकडील 'बंदर अब्बास' बंदरावर केलेल्या हल्ल्यांना इराणने जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news