US Iran Ceasefire Talks | 'समृद्ध युरेनियम इराणमध्येच राहणार'; मोजताबा खामेनी यांनी अमेरिकेची मुख्य मागणी फेटाळली

अमेरिका, इस्रायलसोबत सुरू असलेल्या शांतता चर्चेत अडचणी निर्माण होण्याची शक्यता
US Iran Ceasefire Talks
युद्ध थांबवण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये इराणची भूमिका अधिक आक्रमक झाली आहे.Pudhari
Published on
Updated on

US Iran Ceasefire Talks

तेहरान: इराणचे सर्वोच्च नेते (Supreme Leader) यांनी देशातील शस्त्रनिर्मितीसाठी उपयुक्त असलेल्या समृद्ध युरेनियमचा (Enriched Uranium) साठा इराणबाहेर जाणार नाही, असा आदेश दिल्‍याचे वृत्त 'रॉयटर्स' वृत्तसंस्थेने इराणच्या दोन वरिष्ठ सूत्रांच्‍या हवाल्‍याने दिले आहे. यामुळे आता प्रादेशिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या शांतता चर्चेत यामुळे आणखी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

इराणची भूमिका अधिक आक्रमक

'रॉयटर्स'च्या वृत्तानुसार, आयतोल्ला मोजताबा खामेनी यांच्या या निर्देशामुळे अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध पुकारलेले युद्ध थांबवण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये इराणची भूमिका अधिक आक्रमक झाली आहे. इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला आश्वासन दिले होते की, कोणत्याही शांतता करारात इराणचा समृद्ध युरेनियमचा साठा देशाबाहेर काढण्याची अट समाविष्ट असेल.

US Iran Ceasefire Talks
US Iran tensions | व्हाईट हाऊस म्हणते युद्ध संपले; पण क्षेपणास्त्रांचा मारा सुरुच...

युरेनियम समृद्धीकरणाचा वाद काय आहे?

इस्रायल, अमेरिका आणि अनेक पाश्चिमात्य देशांनी इराणवर अण्वस्त्र निर्मितीचा प्रयत्न करत असल्याचा आरोप प्रदीर्घ काळापासून केला आहे. इराणने युरेनियमचे ६०% पर्यंत समृद्धीकरण केल्यानंतर हे आरोप वाढले आहेत, कारण हा स्तर नागरी वापरापेक्षा खूप जास्त आणि अण्वस्त्रांसाठी लागणाऱ्या स्तराच्या अगदी जवळ आहे. मात्र, इराणने अण्वस्त्रे बनवण्याचा कोणताही हेतू असल्याचा सातत्याने इन्कार केला आहे.

US Iran Ceasefire Talks
Donald Trump: आधी अणुकार्यक्रमावर चर्चा! इराणच्या नव्या प्रस्तावावर ट्रम्प नाराज; तीन अटी स्वीकारण्याची शक्यता कमी

इस्रायलची मागणी काय?

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत इराण आपला समृद्ध युरेनियमचा साठा हटवत नाही, आपल्या समर्थक बंडखोर गटांना (Proxy Militias) मदत करणे बंद करत नाही आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम नष्ट करत नाही, तोपर्यंत हे युद्ध संपू शकत नाही. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाव न सांगण्याच्या अटीवर एका इराणी सूत्राने रॉयटर्सला सांगितले की, "सर्वोच्च नेत्यांचे निर्देश आणि प्रशासनातील एकमत असे आहे की, समृद्ध युरेनियमचा साठा देशाबाहेर जाऊ दिला जाणार नाही."

US Iran Ceasefire Talks
Middle East tensions | युद्धविरामाला विराम! पण तोडगा नाहीच

इराणची नेमकी भीती काय?

इराणी नेत्यांचा असा विश्वास आहे की, युरेनियम परदेशात पाठवल्यास देश अमेरिका आणि इस्रायलच्या भविष्यातील हल्ल्यांना बळी पडू शकतो. इराणमध्ये देशाच्या मोठ्या धोरणात्मक निर्णयांवर सर्वोच्च नेत्यांचाच अंतिम अधिकार असतो. या प्रकरणी व्हाईट हाऊस आणि इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

US Iran Ceasefire Talks
US Iran Agreement : अमेरिका-इराण करार प्रक्रिया एकून तीन टप्प्यांत राबवणार

तणाव वाढला

२८ फेब्रुवारी रोजी इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर भडकलेल्या संघर्षानंतर सध्या युद्धबंदी लागू आहे. या हल्ल्यांनंतर इराणने अमेरिकन लष्करी तळ असलेल्या आखाती देशांना लक्ष्य केले होते, तर दुसरीकडे इस्रायल आणि इराण समर्थक हिजबुल्लाह यांच्यात लेबनॉनमध्ये संघर्ष तीव्र झाला होता. पाकिस्तानच्या मध्यस्थीने शांततेचे प्रयत्न सुरू असले, तरी चर्चेत फारशी प्रगती झालेली नाही. अमेरिकेने इराणच्या बंदरांना घातलेली नाकेबंदी आणि होर्मुझच्या समुद्रधुनीवर (Strait of Hormuz) इराणचे असलेले नियंत्रण यामुळे राजनैतिक पातळीवर गुंतागुंत वाढली आहे.

सध्‍याची युद्धबंदी अमेरिकेचा तात्पुरती माघार

इराणी सूत्रांनी असाही दावा केला आहे की, सध्याची युद्धबंदी ही नवीन हवाई हल्ले सुरू करण्यापूर्वी अमेरिकेने घेतलेली तात्पुरती माघार (स्ट्रॅटेजिक मूव्ह) असू शकते, असा संशय इराणच्या नेतृत्वाला आहे. इराणचे मुख्य शांतता वार्ताकार मोहम्मद बकर कलिबाफ यांनी बुधवारी सांगितले की, "शत्रूच्या उघड आणि छुपे हालचालींवरून असे दिसते की अमेरिका नवीन हल्ल्यांची तयारी करत आहे."दुसरीकडे, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बुधवारी इशारा दिला की, इराणने शांतता कराराला मान्यता न दिल्यास वॉशिंग्टन तेहरानवर आणखी हल्ले करण्यास तयार आहे. मात्र, "योग्य उत्तरे" मिळवण्यासाठी अमेरिका "काही दिवस" वाट पाहू शकते, असेही त्यांनी सुचवले.

तडजोडीचे पर्याय काय?

सूत्रांनुसार, चर्चेदरम्यान दोन्ही बाजूंनी काही मतभेद कमी केले आहेत, परंतु इराणचा अणुकार्यक्रम, विशेषतः समृद्ध युरेनियमच्या साठ्याचे भवितव्य आणि समृद्धीकरणाचा अधिकार कायम ठेवण्याचा इराणचा आग्रह यावरून मोठे मतभेद कायम आहेत. इराणी अधिकाऱ्यांनी वारंवार सांगितले आहे की, युद्ध कायमचे थांबवणे आणि अमेरिका-इस्रायल भविष्यात हल्ले करणार नाहीत याची खात्रीशीर हमी मिळवणे हे तेहरानचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. अशा आश्वासनांनंतरच इराण सविस्तर अणुचर्चेत सहभागी होईल.संघर्ष वाढण्यापूर्वी, इराणने ६०% समृद्ध केलेले आपले निम्मे युरेनियम निर्यात करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, ट्रम्प यांनी इराणवर हल्ले करण्याच्या दिलेल्या वारंवार धमक्यांनंतर इराणने आपली भूमिका बदलली, असे रॉयटर्सच्या सूत्रांनी सांगितले.

US Iran Ceasefire Talks
Strait of Hormuz crisis : 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सर्व जहाजांच्या सुरक्षित प्रवासासाठी इराण तयार'

आयएईए (IAEA) चा अंदाज

दरम्यान, वादावर तोडगा काढण्यासाठी अजूनही काही तडजोडीचे पर्याय उपलब्ध असल्याचे एका इराणी सूत्राने सांगितले. "आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) देखरेखीखाली युरेनियमचा साठा सौम्य (Dilute) करणे यासारखे उपाय उपलब्ध आहेत," असे सूत्राने सांगितले.'इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सी'च्या (IAEA) अंदाजानुसार, जून २०२५ मध्ये जेव्हा इस्रायली आणि अमेरिकन सैन्याने इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले केले होते, तेव्हा इराणकडे ६०% समृद्ध केलेले ४४०.९ किलोग्रॅम युरेनियम होते. सध्या या साठ्याची स्थिती काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news