Trump Asim Munir lunch | नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प-मुनीर ‘लंच डिप्लोमसी’? मोदींनाही गुपचूप बोलावण्याचा केला होता प्रयत्न

Trump Asim Munir lunch | पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न, पाकिस्तानची व्हाईट हाऊसमध्ये थेट एंट्री
Trump Asim Munir lunch
Trump Asim Munir lunchPudhari
Published on
Updated on

Donald Trump-Asim Munir lunch diplomacy Nobel Peace Prize 2025 India Pakistan Trump peace negotiations Asim Munir White House visit

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये घेतलेला लंच सध्या राजकीय व मुत्सद्देगिरीच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. ट्रम्प यांच्या या अनपेक्षित पावलामुळे त्यांच्या नोबेल शांतता पुरस्काराच्या महत्त्वाकांक्षेवर चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.

ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या अध्यक्षीय कार्यकाळात पाकिस्तानवर अमेरिकेला फसवल्याचा आरोप केला होता. पण आता ते मुनीर यांच्यासोबत "प्रेम" व्यक्त करून पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. असीम मुनीर यांनी नुकतेच ट्रम्प यांचे कौतुक करत त्यांना भारत-पाकिस्तान यांच्यातील संभाव्य अणुयुद्ध टाळल्याबद्दल नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करावे अशी शिफारस केली होती.

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या अ‍ॅना केली यांनी स्पष्ट केले की, मुनीर यांच्या या वक्तव्यामुळेच ट्रम्प यांनी त्यांना आमंत्रित केले. त्यामुळे हा लंच म्हणजे केवळ मुत्सद्देगिरी नसून, ट्रम्प यांच्या स्वतःच्या वारशासाठीचा डाव असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

मोदींनाही गुपचूप बोलावण्याचा प्रयत्न?

सुरक्षा विश्लेषक डेरेक ग्रॉसमन यांच्या मते, ट्रम्प यांनी या लंचच्या दिवशीच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही व्हाईट हाऊसला आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता.

त्यावर टीका करताना ग्रॉसमन यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले, "ट्रम्प यांना भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाची पार्श्वभूमी समजत नाही. त्यांना केवळ एक फोटो आणि त्यावरून नोबेल पुरस्कार हाच हेतू वाटतो."

Trump Asim Munir lunch
Ayatollah Khamenei succession | खामेनींना हटविण्याचा ट्रम्प यांचा इशारा; इराणच्या नेतृत्वासाठी 'या' चार नावांची चर्चा

ट्रम्प-मुनीर भेटीमागचे राजकारण

पश्चिम आशियातील तणाव, विशेषतः इराणच्या अणुकार्यक्रमामुळे अमेरिकेसह इतर देश सतर्क झाले आहेत. इराणविरोधात भविष्यकाळात कारवाई करायची वेळ आल्यास पाकिस्तानच्या भौगोलिक आणि लष्करी महत्त्वाकडे अमेरिका पुन्हा लक्ष देत आहे, असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे.

इतिहास पाहता, पाकिस्तानने अमेरिकेच्या मध्य आशियातील मोहिमांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे इराणला इस्लामी जगतात एकटे ठेवण्याच्या अमेरिकेच्या रणनीतीत पाकिस्तानचा प्रभाव कमी करणे हेही या भेटीमागचे कारण असू शकते.

भेटीची व्यवस्था कुणी केली?

ही भेट पाकिस्तानी-अमेरिकन उद्योजक साजिद तारार यांनी घडवून आणली. ते 'अमेरिकन मुस्लिम्स फॉर ट्रम्प' या संघटनेचे संस्थापक आहेत. त्यांनी असीम मुनीर यांच्यासाठी फोर सीझन्स हॉटेलमध्ये स्वतंत्र स्वागत समारंभाचेही आयोजन केले होते.

यावेळी मुनीर यांनी परदेशस्थ पाकिस्तानी नागरिकांचे कौतुक करत, त्यांना "देशाचे खरे राजदूत" असे म्हटले.

Trump Asim Munir lunch
Iran Us War | झुकेगा नहीं... म्हणत इराणचा ट्रम्प यांना इशारा; शरणागती विसरा, नुकसान अमेरिकेचंच होणार - खामेनींनी ठणकावलं...

भारताची तीव्र प्रतिक्रिया

ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष रोखल्याचा दावा केल्यावर भारताने त्याला खोडून काढले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्याशी झालेल्या 35 मिनिटांच्या फोन संवादात स्पष्ट केले की, मे महिन्यातील चार दिवसांचा संघर्ष भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वामधील थेट चर्चेनेच थांबवण्यात आला होता.

भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी ठामपणे सांगितले, "भारत आपल्या द्विपक्षीय प्रश्नांमध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी स्वीकारत नाही, आणि कधीही स्वीकारणार नाही."

या संघर्षाची सुरुवात 22 एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे झाली होती, ज्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला. भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ले केले. पाकिस्तानने क्षेपणास्त्रहल्ल्यांनी प्रत्युत्तर दिले, पण भारताच्या एअर डिफेन्सने ते निष्प्रभ केले.

Trump Asim Munir lunch
World's Best Airline 2025 | सलग दुसऱ्यांदा जगात सर्वोत्तम ठरली आशियातील 'ही' एअरलाईन कंपनी, जाणून घ्या जगातील टॉप 10 एअरलाईन्स...

नोबेल पुरस्कारासाठी नाटक?

राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, ट्रम्प यांचे असीम मुनीर यांच्यासोबत लंच केवळ मुत्सद्देगिरी नव्हे, तर शांततेचा दूत म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रचारात्मक प्रयत्न आहे. ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळावा, यासाठीचा हा डाव असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नोबेल शांतता पुरस्काराची पात्रता ठरवताना, अणुशस्त्र नियंत्रण, शांतता करार, लोकशाही व मानवी हक्कांसाठी योगदान, आणि जागतिक शांततेसाठी ठोस कार्य अशा निकषांचा विचार केला जातो. ट्रम्प यांचे हे पाऊल त्या निकषांवर उतरते की नाही, हे येणारा काळच ठरवेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news