Trump Jensen Huang image: हातात लाल ब्रा आणि रक्तबंबाळ चेहरा... जेन्सन यांच्या पुनर्नियुक्तीवर ट्रम्प यांनी शेअर केला फोटो

हुआंग यांच्या या पुनरागमनाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर अतिशय अनोख्या पद्धतीने स्वागत केले आहे.
Trump Jensen Huang AI image
Trump Jensen Huang AI imageTrump
Published on: 
Updated on: 

Trump Jensen Huang AI image

वॉशिंग्टन: अनैतिक संबंधांच्या आरोपांनंतर राजीनामा दिलेले जेन्सन हुआंग यांची एनव्हिडिया कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तत्काळ प्रभावाने पुनर्नियुक्ती करण्यात आली. हुआंग यांच्या या पुनरागमनाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर अतिशय अनोख्या पद्धतीने स्वागत केले आहे. ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल' या प्लॅटफॉर्मवर हुआंग यांचा एक एआय-जनरेटेड फोटो शेअर केला असून, यामध्ये हुआंग यांच्या हातात लाल रंगाची ब्रा दिसत आहे.

जुलै २०२४ मध्ये पेनसिल्व्हेनियातील बटलर येथील प्रचारसभेत ट्रम्प यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर त्यांनी मूठ आवळून दिलेली ऐतिहासिक पोझ या एआय फोटोमध्ये रिक्रिएट करण्यात आली आहे. या फोटोत हुआंग यांचा चेहरा रक्तबंबाळ झालेला असून त्यांच्या भोवती सिक्रेट सर्व्हिसचे एजंट उभे आहेत आणि मागे एनव्हिडियाचा ध्वज फडकताना दिसत आहे. वैयक्तिक वादातून सावरत हुआंग यांनी केलेले पुनरागमन हे आपल्या स्वतःच्या राजकीय पुनरुत्थानासारखेच असल्याचे ट्रम्प यांनी या फोटोद्वारे दाखवले आहे.

Trump Jensen Huang AI image
Jensen Huang: "दुसऱ्या कार्यकाळात मी अधिक चांगला CEO बनेल": जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात जेन्सन हुआंग यांचे एनव्हिडियात स्वागत

ट्रम्प यांच्याकडून हुआंग यांचे स्वागत

एनव्हिडियाच्या संचालक मंडळाने हुआंग यांना पुन्हा सीईओ पदी नियुक्त केल्यानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी ही पोस्ट शेअर केली. ट्रम्प यांनी यापूर्वीच हुआंग यांच्या पुनर्नियुक्तीसाठी जाहीर पाठिंबा दर्शवला होता. कंपनीने घेतलेला हा निर्णय "अत्यंत उत्तम आणि योग्य" असल्याचे म्हणत ट्रम्प यांनी एनव्हिडियाचे अभिनंदन केले.

हुआंग यांच्या पुनरागमनामुळे राष्ट्रीय सुरक्षेला कोणताही धोका नसल्याचे सांगत, "हुआंग यांनी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केल्याचे पुरावे अमेरिकन सरकारकडे नसल्याचे अॅटर्नी जनरल यांनी स्पष्ट केले आहे," असे ट्रम्प यांनी नमूद केले. एनव्हिडियाला अमेरिकेच्या निर्यात नियंत्रणांचे पालन करण्याबाबतची अंतर्गत चौकशी सुरू ठेवावी, असे आवाहनही ट्रम्प यांनी केले आहे.

वाद आणि राष्ट्रीय सुरक्षा

हुआंग यांचे अनेक महिलांशी संबंध असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. यामध्ये एनव्हिडियाच्या दोन महिला कर्मचाऱ्यांसह चीनची संशयित हेर असलेल्या एका महिलेचाही समावेश असल्याचा आरोप होता. या प्रकरणामुळे त्यांच्या निर्णयक्षमतेवर आणि कंपनीने संभाव्य राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंता कशा हाताळल्या यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

मात्र, या वादाचा हुआंग यांच्या सार्वजनिक प्रतिमेला फायदाच होईल, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. सोमवारी 'सीएनबीसी'ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, हा वाद एनव्हिडियाच्या सीईओंसाठी फायदेशीरच ठरेल. सेक्स सेल्स असे सांगत ट्रम्प यांनी "या वादाने हुआंग यांचे महत्त्व कमी होणार नाही, उलट ते ज्या परिस्थितीतून गेले आहेत त्याबद्दल लोकांच्या मनात त्यांच्याविषयी आदरच निर्माण होईल," असे म्हटले आहे.

Trump Jensen Huang AI image
Nvidia Jensen Huang: एनव्हिडियाचे CEO जेन्सन यांची किती अफेअर्स? आता कंपनीतीलच एका महिला अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचे समोर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.