Donald Trump Iran Ceasefire: डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा: इराणसोबतचा युद्धविराम वाढवला; पाहा काय आहेत अटी!

इराणसोबतचा तणाव निवळण्याची चिन्हे नसतानाच, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी युद्धविराम वाढवण्याची घोषणा केली.
Donald Trump
Donald Trumpfile photo
Published on
Updated on

Donald Trump Iran Ceasefire

वॉशिंग्टन: इराणसोबतचा तणाव निवळण्याची चिन्हे नसतानाच, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी युद्धविराम वाढवण्याची घोषणा केली. ही मुदत संपण्यास काही तास उरले असतानाच ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला. इराणच्या नेतृत्वामध्ये सध्या मोठे मतभेद असून, जोपर्यंत ते एखादा ठोस प्रस्ताव घेऊन येत नाहीत, तोपर्यंत ही मुदतवाढ लागू राहील, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

पाकिस्ताची मध्यस्थी आणि वाटाघाटींना ब्रेक

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हॅन्स हे शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार होते, मात्र हा दौरा सध्या स्थगित करण्यात आला आहे. इराणने अमेरिकेच्या प्रस्तावांना अद्याप प्रतिसाद न दिल्याने ही चर्चा थांबल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानने केलेल्या विनंतीचा मान राखून आपण हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे नमूद केले.

इराणची भूमिका मात्र नकारात्मक

ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर इराणकडून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाखेर कालीबाफ यांचे सल्लागार मेहदी मोहम्मदी यांनी ट्रम्प यांचा निर्णय फेटाळून लावला आहे. "ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवण्याला काहीही अर्थ नाही," असे म्हणत त्यांनी अमेरिकेच्या या पाऊलाची खिल्ली उडवली.

आक्रमक पावित्रा कायम; नाकेबंदी सुरूच

एकीकडे युद्धविराम वाढवला असला, तरी इराणवरील दबाव कमी करण्यास ट्रम्प यांनी नकार दिला आहे. इराणच्या बंदरांकडे जाणाऱ्या जहाजांची अमेरिकन नाकेबंदी यापुढेही सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी एका मुलाखतीत ट्रम्प यांनी "इराणने अटी मान्य न केल्यास बॉम्बफेक करू," असा इशारा दिला होता. दुसरीकडे, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास आराघची यांनी ही नाकेबंदी म्हणजे थेट 'युद्धाची घोषणा' असल्याचे म्हटले आहे.

या मुद्द्यांवरून पेच कायम

दोन्ही देश पुन्हा चर्चेच्या टेबलावर आले तरी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरून संघर्ष होण्याची शक्यता आहे:

अणुऊर्जा कार्यक्रम: इराणच्या अणुकार्यक्रमावर अमेरिकेचा तीव्र आक्षेप.

हॉर्मुझची सामुद्रधुनी: तेल आणि वायू वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावरील इराणच्या कारवायांमुळे जागतिक व्यापारावर परिणाम झाला आहे.

नौदलाची कारवाई: इराणकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांच्या भीतीमुळे या मार्गावरील वाहतूक मंदावली असून, अमेरिकन नौदलाने आतापर्यंत २८ जहाजांना माघारी फिरण्यास भाग पाडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news