Peace Summit Washington: ‘बोर्ड ऑफ पीस’ परिषदेत शाहबाज शरीफ दुय्यम; ट्रम्पकडून मोदींचे कौतुक

सामूहिक छायाचित्रात मागील रांगेत स्थान; ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शरीफ सोशल मीडियावर ट्रोल
Peace Summit Washington
Peace Summit WashingtonPudhari
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयोजित केलेल्या ‌‘बोर्ड ऑफ पीस‌’ परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना जागतिक स्तरावर अपमानाला सामोरे जावे लागले आहे. जगभरातील 40 हून अधिक देशांच्या नेत्यांचे सामूहिक छायाचित्र काढण्यात आले. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अगदी मध्यभागी आणि प्रमुख मित्रराष्ट्रांच्या नेत्यांसोबत उभे होते. मात्र, त्याच वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना मागच्या रांगेत फिफा प्रमुखांच्याही मागे बसवण्यात आले होते. या छायाचित्रात शरीफ अवघडलेले आणि दुर्लक्षित दिसत होते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी शरीफ यांना एकाकी पाडत पंतप्रधान मोदी यांचे कौतुकही केले.

Peace Summit Washington
Jeffrey Epstein Estate: एपस्टिन इस्टेटकडून 350 लाख डॉलर्सच्या भरपाईची तयारी

गाझा संघर्षावर चर्चा करण्यासाठी वॉशिंग्टन डीसी येथे बोलावण्यात आलेल्या या जागतिक नेत्यांच्या बैठकीत पाकिस्तानचा प्रभाव दाखवण्याचा शरीफ यांचा मनसुबा सपशेल फसला. याउलट बैठकीदरम्यान त्यांच्या स्वतःच्या काही कृती आणि त्यांना मिळालेल्या वागणुकीमुळे पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे.

Peace Summit Washington
Pakistan Army Gaza Deployment: ‘गाझा’ मुद्द्यावरून पाकिस्तान सैन्यात बंडाची चिन्हे; असीम मुनीर यांच्याविरोधात माजी सैनिकांचा एल्गार

बैठकीदरम्यान ट्रम्प यांचे भाषण सुरू असताना त्यांनी अचानक भर सभेत शरीफ यांच्याकडे हात करून त्यांना उभे राहण्याचा इशारा केला. एका देशाचे पंतप्रधान असूनही शाहबाज शरीफ आज्ञाधारकपणे जागेवर उभे राहिले. याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले.

Peace Summit Washington
Jeffrey Epstein Files Donald Trump: एपस्टिन फाईल्समध्ये ट्रम्प यांचा 38 हजार वेळा उल्लेख

शरीफ यांनी ट्रम्प यांना मारला सॅल्यूट

ट्रम्प यांनी शाहबाज शरीफ यांना उभे राहायला लावले आणि त्याच वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरसभेत तोंडभरून कौतुक केले. या दौऱ्यातील आणखी एका व्हायरल व्हिडीओने पाकिस्तानची अब्रू वेशीवर टांगली आहे. या व्हिडीओमध्ये शाहबाज शरीफ हे डोनाल्ड ट्रम्प यांना एखाद्या सुरक्षारक्षकाप्रमाणे ‌‘सॅल्यूट‌’ करताना दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news