प्रातिनिधिक छायाचित्र.
आंतरराष्ट्रीय
थायलंडमध्ये ३१ ठार : लहान मुलांच्या हॉस्पिटलवर अंदाधूंद गोळीबार – Thailand mass shooting
पुढारी ऑनलाईन – थायलंड येथील वायव्य प्रांतात लहान मुलांच्या डे केअर हॉस्पिटलवर अंदाधूंद गोळीबार झाला असून ,यात ३१ जण ठार झाले आहेत. मृतांत लहान मुलं आणि प्रौढांचाही समावेश आहे. गोळीबार करणारा व्यक्ती हा निवृत्त पोलिस अधिकारी आहे. या व्यक्तीच्या मागावर सध्या पोलिस आहेत. (Thailand mass shooting)
थायलंडच्या प्रवक्त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. "पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेतली आहे. संबंधित सर्व विभागांना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत." थायलंडमध्ये अशा प्रकारे सामूहिक हत्या करण्याची घटना यापूर्वी २०२०मध्ये घडली होती, यात २९ लोकांचा बळी गेला होता.
हेही वाचा

