इस्रायलमधील जाफा येथे दहशतवादी हल्ला, अंदाधुंद गोळीबारात ७ ठार

Israel Terrorist Attack | दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा
Israel terrorist attack
इस्रायलमधील जाफा येथे दहशतवादी हल्ला, अंदाधुंद गोळीबारात ७ ठार file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायलची राजधानी तेल अवीवजवळील जाफा (Jaffa) येथे मंगळवारी संध्याकाळी दहशतवादी हल्ला (Israel Terrorist Attack) झाला. हल्लेखोरांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात (Jaffa shooting) ७ जणांचा मृत्यू झाला, तर ८ जण जखमी झाले. दरम्यान, दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

जाफा शहरातील जेरुसलेम रस्त्यावर ही घटना घडली. लाइट रेल्वे स्टेशनच्या शेजारी जेरुसलेम स्ट्रीटवर दहशतवाद्यांनी गोळीबार (Jaffa shooting) केला. दोन दहशतवादी ज्यापैकी एकाकडे रायफल तर दुसऱ्याकडे चाकू होता. त्यांनी तेल अवीव लाइट रेल्वेवर उतरण्यापूर्वी लोकांवर हल्ला केला. त्यानंतर जेरुसलेम रस्त्यावरील लोकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला, तर ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून हल्ला करणारे दोन्ही दहशतवादी मारले गेले आहेत. (Israel Terrorist Attack)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news