Shigeru Ishiba | शिगेरू इशिबा जपानचे नवे पंतप्रधान

फुमियो किशिदा यांची जागा घेणार
Shigeru Ishiba, Japan
शिगेरू इशिबा जपानचे नवे पंतप्रधान होणार आहेत.(Image source-X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

शिगेरू इशिबा (Shigeru Ishiba) हे जपानचे (Japan) नवे पंतप्रधान होणार आहेत. ते पंतप्रधान म्हणून फुमियो किशिदा यांची जागा घेणार आहेत. किशिदा यांनी गेल्या महिन्यात पदाचा राजीनामा दिला होता.

६७ वर्षीय इशिबा यांनी शुक्रवारी सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) नेतेपदाच्या निवडणुकीत २१५ मते मिळवून विजय मिळवला. यामुळे त्यांचे जपानचे पुढील पंतप्रधान बनणे जवळपास निश्चित झाले आहे, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

माजी संरक्षण मंत्री राहिलेले इशिबा यांनी साने ताकाइची यांच्या विरोधात विजयी मिळवला. ताकाइची यांना १९४ मते मिळाली. इशिबा याआधीही पक्षाच्या नेतेपदाच्या शर्यतीत जवळ पोहोचले होते. पण २०१२ मध्ये त्यांचा शिंजो आबे यांनी पराभव केला होता. आबे यांची नंतर हत्या झाली होती.

चार वेळा अपयश, पाचव्या प्रयत्नात यश

शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत इशिबा आणि ताकाइची यांच्यात चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत विक्रमी नऊ उमेदवार रिंगणात होते. याआधी इशिबा हे एलडीपी पक्षाच्या नेतेपदाच्या निवडणुकीत चार वेळा अपयशी ठरले होते. पण पाचव्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले आहे.

संसदेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या एलडीपीमधील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी ऑगस्टमध्ये राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला होता.

Who is Shigeru Ishiba : कोण आहेत शिगेरू इशिदा?

शिगेरू इशिदा यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९५७ रोजी झाला. त्यांचे वडील सरकारी अधिकारी होते. तर त्यांच्या आई शिक्षिका होत्या. शालेय शिक्षणानंतर इशिबा टोकियोला गेले आणि त्यांनी तेथे केयो विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतले. बँकिंग क्षेत्रात काही काळ काम केल्यानंतर त्यांनी १९८६ मध्ये संसदेत प्रवेश केला. १९८६ मधील ते हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमधील सर्वात तरुण सदस्य होते. त्यांनी टिटोरी प्रीफेक्चरमधून एलडीपीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. इशिबा यांनी अडचणीच्या काळात पक्षाची धुरा सांभाळली. त्यांनी संरक्षण मंत्री म्हणूनही काम केले. त्यांच्या कारकिर्दीत पक्षातर्गंत मतभेद झाल्यामुळे त्यांना अनेकदा बाजूला केले गेले, असे एएफपी वृत्तसंस्थेने दिलेले वृत्तात म्हटले आहे.

Shigeru Ishiba, Japan
दक्षिण चिनी समुद्रावर तणावाचे ढग; जपानची युद्धनौका तैवान-चीनच्या समुद्रधुनीत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news