White Hydrogen: वैज्ञानिकांनी शोधला 'व्हाईट हायड्रोजन'चा नैसर्गिक साठा; 1,70,000 वर्षे उर्जा पुरवठा शक्य

White Hydrogen: हायड्रोजनची जागतिक मागणी 2050 पर्यंत सहापटीने वाढणार असल्याचा अंदाज
White Hydrogen
White HydrogenPudhari
Published on
Updated on

Scientist found white hydrogen Deposits That Can Fuel Earth For 1,70,000 Years

नवी दिल्ली : स्वच्छ ऊर्जा (Clean Energy) मिळवण्यासाठी जगभरात चाललेल्या शोधात एक मोठे क्रांतीकारी यश मानवाच्या हाती लागले आहे. वैज्ञानिकांनी पृथ्वीच्या गर्भात 'व्हाईट हायड्रोजन' या नैसर्गिक आणि प्रदूषणमुक्त इंधनाचा अपार साठा शोधून काढला आहे.

या शोधामुळे 1 लाख 70 हजार वर्षांपर्यंत कार्बनमुक्त ऊर्जा पुरवठा शक्य होणार असून, हा शोध जागतिक ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडवणारा ठरणार आहे.

ऑक्सफर्ड, डर्हॅम आणि टोरोंटो विद्यापीठांच्या आंतरराष्ट्रीय संशोधन पथकाने हा शोध लावला आहे. त्यांनी पृथ्वीच्या भूगर्भात खोलवर या नैसर्गिक हायड्रोजन साठ्याचा शोध घेतला आहे. व्हाईट हायड्रोजन कोळसा किंवा नैसर्गिक गॅससारख्या प्रदूषक इंधनांना एक स्वच्छ आणि टिकाऊ पर्याय ठरू शकतो.

व्हाईट हायड्रोजन म्हणजे काय?

सध्या वापरात असलेला हायड्रोजन प्रामुख्याने कोळसा किंवा नैसर्गिक वायूपासून तयार केला जातो, ज्यामध्ये प्रचंड उर्जा लागते आणि त्यातून हरितगृह वायूही निर्माण होतो.

पण व्हाईट हायड्रोजन पूर्णतः नैसर्गिक स्वरूपात तयार होतो आणि तो बाहेर काढतानाही कोणतेही प्रदूषण होत नाही. त्याच्या ज्वलनानंतर केवळ पाण्याची निर्मिती होते – यामुळे तो पृथ्वीवरील सर्वात स्वच्छ उर्जा स्रोत मानला जातो.

White Hydrogen
Pakistan Hunger Emergency: पाकिस्तानात अन्नटंचाई! 1 कोटी 10 लाख नागरीक उपासमारीच्या उंबरठ्यावर, संयुक्त राष्ट्राने दिला गंभीर इशारा

व्हाईट हायड्रोजन तयार कसा होतो?

व्हाईट हायड्रोजन हे तेल किंवा गॅससारखे मोठ्या साठ्यांमध्ये साठलेले नसते. तो हजारो वर्षांच्या कालावधीत विशिष्ट प्रकारच्या खडकांमध्ये आणि पाण्याच्या रासायनिक अभिक्रियांमधून तयार होतो.

कॅनडामधील "कॅनेडियन शील्ड" या प्राचीन भूगर्भीय प्रदेशात असे हायड्रोजनचे सूक्ष्म 'सीप्स' म्हणजेच गळतीचे स्त्रोत आढळले आहेत. हे लक्षण असे सुचवते की अशा साठ्यांची उपस्थिती केवळ कॅनडापुरती मर्यादित नसून ती आफ्रिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या खंडांपर्यंत असू शकते.

उत्खननाची आव्हाने

व्हाईट हायड्रोजनच्या उत्खननासाठी पारंपरिक तेल व गॅस उत्खनन पद्धती अपुऱ्या पडतात. वैज्ञानिक सध्या अशा नव्या उपकरणांची आणि भौगोलिक मॉडेल्सची निर्मिती करत आहेत, जे हायड्रोजन कुठे तयार होतो, कसा वाहतो, आणि कुठे साठतो हे अचूकपणे शोधू शकतील.

तथापि, एक अनपेक्षित अडथळा वैज्ञानिकांच्या आड आला आहे तो म्हणजे भूमिगत सूक्ष्मजीव! हे हायड्रोजनवर उपजीविका करणारे जीवाणू (Hydrogen-consuming bacteria) काही ठिकाणी साठ्यांवर हल्ला करून ते संपवत आहेत.

त्यामुळे ज्या भागात हे जीवाणू कमी आहेत अशा साठ्यांची ओळख पटवणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

White Hydrogen
Ratan Tata's will: मोहिनी दत्ता यांना मिळणार रतन टाटा यांच्या संपत्तीतील 588 कोटींचा वाटा

औद्योगिक व्यावसायिकीकरणाची सुरुवात

या शोधाचे व्यावसायिक रूपांतर करण्यासाठी Snowfox Discovery Ltd. ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. सॅटेलाइट इमेजिंग आणि भूगर्भीय सर्वेक्षणाद्वारे ही कंपनी भविष्यातील हायड्रोजन साठ्यांचे स्थान निश्चित करणार आहे.

ऊर्जा स्वावलंबन आणि पर्यावरण रक्षणाची नवी दिशा

जगभरातील देश जेव्हा शून्य-कार्बन उत्सर्जनाच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करत आहेत आणि जीवाश्म इंधनांच्या अस्थिर बाजारावर अवलंबून राहणं टाळू पाहत आहेत, तेव्हा व्हाईट हायड्रोजन हा एक दीर्घकालीन आणि टिकाऊ उपाय ठरू शकतो.

2050 पर्यंत हायड्रोजनची जागतिक मागणी सहापटीने वाढणार असल्याचा अंदाज आहे, आणि या पार्श्वभूमीवर सापडलेला नैसर्गिक साठा अत्यंत आशादायक ठरतो.

या शोधामुळे स्वच्छ आणि स्वस्त उर्जा निर्मितीसाठी एक नवा अध्याय सुरू होऊ शकतो. विज्ञान, पर्यावरण आणि उर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा शोध म्हणजे एक सुवर्णसंधी ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news