MIDDLE EAST CRISIS : इराणी संघर्षात आता सौदी अरेबियाचीही एन्ट्री: अमेरिकेसोबत मिळून इराकमधील इराणसमर्थक फायटर्सवर हल्ला

अमेरिका-सौदीचा हल्ला म्हणजे दहशतवादी कृत्य: इराण
MIDDLE EAST CRISIS
MIDDLE EAST CRISIS
Published on
Updated on

MIDDLE EAST CRISIS : इराण-अमेरिका संघर्षात आता सौदी अरेबियानेही उडी घेतली आहे. सौदीने अमेरिकेसोबत मिळून मंगळवारी रात्री इराकमधील इराणसमर्थक 'पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्स'च्या (PMF) तळांवर जोरदार हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यात २० फायटर्स ठार झाले असून ३२ जण गंभीर जखमी झाले आहेत, असे वृत्त 'एएफपी'ने दिले आहे.

इराणने डागलेली क्षेपणास्‍त्रे हवेतच रोखली

अमेरिकन सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, या तळांवरून अमेरिकन सैनिक आणि सौदी अरेबियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर (ऊर्जा तळांवर) हल्ल्यांची तयारी सुरू होती. या हल्ल्याच्या अवघ्या काही तासांनंतर इराणने प्रत्युत्तराखल अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. ही क्षेपणास्त्रे जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळाच्या दिशेने डागली गेली होती, परंतु ती सर्व हवेतच यशस्वीपणे रोखण्यात (इंटरसेप्ट) आली.

अमेरिका-सौदीचा हल्ला म्हणजे दहशतवादी कृत्य: पीएमएफ

इराकच्या 'पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्स'ने अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या संयुक्त हवाई हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या हल्ल्यात PMF च्या किमान २० फायटर्सचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.PMF ने टेलिग्रामवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "सौदी अरेबिया आणि अमेरिकेने आमच्या मुख्यालयाला आणि लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करून विश्वासघाताने दहशतवादी हल्ला केला आहे." तसेच, आपले सर्व फायटर्स पूर्णपणे सतर्क असून कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असल्याचेही या संघटनेने स्पष्ट केले आहे.

MIDDLE EAST CRISIS
Iran UAE Attack: इराणचा होर्मुझ सामुद्रधुनीत UAE च्या तेलवाहू जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ला; एका भारतीयाचा मृत्यू, आठ जण जखमी

होर्मुझ आमचाच, संसदेत नवीन कायदा आणत आहोत: इराणी खासदार

इराणच्या संसदेचे उपाध्यक्ष अली निकझाद यांनी स्पष्ट केले की, 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' (होर्मुझची सामुद्रधुनी) हा इराणचाच भाग आहे आणि तो कायम इराणचाच राहील. इराणी संसद या मोक्याच्या सागरी मार्गाच्या व्यवस्थापनाशी संबंधित एका नवीन कायद्यावर विचार करत असतानाच त्यांचे हे विधान समोर आले आहे. इराणच्‍या सरकारी माध्यमांशी बोलतानानिकझाद म्हणाले की, होर्मुझची सामुद्रधुनी आता पूर्वस्थितीत येणार नाही. इराण या सागरी मार्गावरील आपल्या अधिकारांपासून मागे हटणार नाही. संसदेच्या सर्व सदस्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, या प्रस्तावित कायद्यात नेमक्या कोणत्या तरतुदी असतील आणि तो संमत झाल्यास काय बदल होतील, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.

अमेरिकेकडून इराकमधील आपल्या नागरिकांसाठी सुरक्षेचा इशारा जारी

बगदाद येथील अमेरिकन दूतावासाने इराकमध्ये असलेल्या अमेरिकन नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. इराणसमर्थित गटांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हा सल्ला देण्यात आला आहे. दूतावासाने अमेरिकन नागरिकांना स्थानिक बातम्यांवर लक्ष ठेवण्याचे आणि इराकी अधिकाऱ्यांच्या निर्देशांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव कोणतीही पूर्वसूचना न देता हवाई क्षेत्र बंद केले जाऊ शकते किंवा विमान उड्डाणांमध्ये अडथळा येऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी आपल्या फ्लाइटचे स्टेटस तपासून पाहावे, असा सल्ला दूतावासाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news