Santa Clara police shooting : अमेरिकेतील पोलिसांनी ३२ वर्षाच्या भारतीय तरूणाचा केला एन्काऊंटर; दोन आठवड्यानंतर घरच्यांपर्यंत पोहचली बातमी

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सँटा क्लाराच्या पोलिसांनी भारताच्या ३२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा एन्काऊंटर केला.
Santa Clara police shooting Mohammed Nizamuddin
Santa Clara police shooting Mohammed Nizamuddin Canva
Published on
Updated on

Santa Clara police shooting Indian Student :

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सँटा क्लाराच्या पोलिसांनी भारताच्या ३२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा एन्काऊंटर केला. मुळचा तेलंगाणाचा असणाऱ्या ३२ वर्षाच्या मोहम्मद निजामुद्दीनचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. निझामुद्दीनवर त्याच्या रूममेटवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप होता. विशेष म्हणजे ही घटना ३ सप्टेंबर रोजी घडली. मात्र याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबियांना दोन आठवड्यांनी मिळाली.

निजामुद्दीनचे वडील हुसनुद्दीन यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, आम्हाला आमच्या मुलाच्या मृत्यूची बातमी १८ सप्टेंबरला समजली. ही माहिती माझ्या मुलाच्या मित्रानं दिली. तो मुळचा कर्नाटकमधील रायचूर जिल्ह्यातील आहे. तो देखील निजामुद्दीनसोबत सँटा क्लारा इथं राहत होता.

निजामुद्दीनचे वडील म्हणाले, 'मी माझ्या मुलाला सतत फोन करत होते. मात्र त्याचा फोन स्विच ऑफ लागत होता. त्यानंतर काही दिवसांनी मला तो मारला गेल्याची माहिती मिळाली.'

Santa Clara police shooting Mohammed Nizamuddin
iPhone 17 price & Offer : आयफोन १७ खरेदी करण्यासाठी पहाटेपासून झुंबड; जाणून घ्या भारतातील किंमत अन् ऑफर

मिळालेल्या माहितीनुसार निजामुद्दीनला चार गोळ्या लागल्या होत्या. त्याची ओळख त्वरित पटली नाही. त्याचा मृतदेह हा स्थानिक रूग्णालयात पडून होता. निजामुद्दीन हा २०१६ मध्ये अमेरिकेत गेला होता. तो उच्च शिक्षणासाठी फ्लोरिडा इथं होता. त्यानंतर तो सँटा क्लारा इथं शिफ्ट झाला. तिथं तो अजून काही लोकांसोबत शेअरिंगमध्ये राहत होता. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते आणि मजलीस बचाओ तेहरीकचे प्रमुख अमजद इल्लाह खान यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना निजामुद्दीनचा मृतदेह भारतात आणण्यासाठी मदत करावी असं पत्र लिहिलं आहे.

पोलिसांचं काय म्हणणं?

दरम्यान, सँटा क्लारा पोलीस विभागानं त्यांच्या वेबसाईटवर याबाबत एक वक्तव्य प्रसिद्ध केलं आहे. यानुसार पोलिसांनी दावा केला की, आम्ही स्थानिक वेळेनुसार सकाळी ६.०८ वाजता ९११ च्या एका आपत्कालीन कॉलनंतर घटनास्थळी पोहचलो. हा कॉल एका रहिवाशी इमारतीत चाकू हल्ला झाल्याचा होता.

वक्तव्यात म्हटलं आहे की, ' ज्यानं ९११ कॉल केला त्यानं संशयितानं एका व्यक्तीला भोकसल्याची माहिती दिली. त्यानंतर SCPD घटनास्थळी पोहचले. त्यानंतर त्यांनी संशयिताचा एन्काऊंटर केला. यानंतर संशयिताला स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं. याचबरोबर जखमीला देखील पोलिसांनी रूग्णलयात दाखल केलं होतं. त्याच्यावर उपचार सुरू आहे. यात कोणताही पोलीस अधिकारी जखमी झालेला नाही.'

पोलिस अधिकारी कोरी मॉर्गन यांनी सांगितलं की, दोन रूममेटमधील वाद टोकाला पोहचला. त्यानंतर एकानं दुसऱ्या रूममेटला भोकसण्यास सुरूवात केली. ज्यावेळी पोलीस घरात शिरले त्यावेळी निजामुद्दीनच्या हातात चाकू होता. तो पुन्हा हल्ला करण्याची धमकी देत होता.

मॉर्गन पुढे म्हणाले, 'आमच्या प्राथमिक चौकशीनंतर आम्हाला असं वाटतं की पोलीस अधिकाऱ्यानं पुढचा धोका टाळण्यासाठी आणि निदान एकाचा जीव वाचवण्यासाठी हे पाऊल उचललं.'

Santa Clara police shooting Mohammed Nizamuddin
Samir Modi: लैंगिक अत्याचार प्रकरणी ललित मोदीचा भाऊ समीर मोदीला अटक

कुटुंबाला बसला धक्का

निजामुद्दीनचे कुटुंबिय हे महबुबनगरमध्ये राहतात. त्यांना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची बातमी मिळताच धक्का बसला. त्यांना याबाबतची माहिती देखील उशिरा मिळाली. याबाबत निजामुद्दीनचे वडील म्हणाले की, 'आम्हाला त्याचा मृतदेह परत आणायचा आहे. त्याचे योग्य पद्धतीनं अंत्य संस्कार करायचे आहेत.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news