iPhone 17 price & Offer : आयफोन १७ खरेदी करण्यासाठी पहाटेपासून झुंबड; जाणून घ्या भारतातील किंमत अन् ऑफर

iPhone 17 मालिकेचे भारतातील दर आणि ऑफर्स अधिकृतपणे जाहीर झाले असून, या वेळी सर्व मॉडेल्सची सुरुवात 256GB स्टोरेजपासून होते.
iPhone 17
iPhone 17 Canva Image
Published on
Updated on

iPhone 17 Launch in India price & Offer :

बहुप्रतिक्षित आयफोन १७ ची सिरीज भारतात लाँच झाली आहे. भारतात आयफोनची क्रेज जबरदस्त आहे. त्यामुळेच आयफोन १७ लाँच होणार म्हटल्यावर स्टोअरच्या बाहेर त्याच्या चाहत्यांनी काल रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. हा नवा आयफोन १७ हा ios 26 सॉफ्टवेअर आणि अद्यावत सिलिकॉन बॅटरीनं लेस असणार आहे. याचबरोबर नव्या अॅपल १७ मध्ये अनेक AI फिचर्स असणार आहेत. यात अॅपल इंटेलिजन्सची सेवा देखील देण्यात आली आहे.

iPhone 17 मालिकेचे भारतातील दर आणि ऑफर्स अधिकृतपणे जाहीर झाले असून, या वेळी सर्व मॉडेल्सची सुरुवात 256GB स्टोरेजपासून होते. त्यामुळे किंमत जरी जास्त वाटत असली तरी दिलेल्या स्टोरेजमुळे हे मॉडेल्स स्वस्त पडणार आहेत.

iPhone 17
Maruti GST Price Cut: मारुती सुजुकीची मोठी घोषणा! आता ३.५० अन् ५ लाखात मिळणार गाडी; जाणून घ्या कोणत्या मॉडेलच्या किंमती झाल्या कमी

iPhone 17 Series दर (भारत)

  • iPhone 17 (256GB): ₹82,900

  • iPhone 17 (512GB): ₹1,02,900

  • iPhone Air (256GB): ₹1,19,900

  • iPhone Air (512GB): ₹1,39,900

  • iPhone Air (1TB): ₹1,59,900

  • iPhone 17 Pro (256GB): ₹1,34,900

  • iPhone 17 Pro (512GB): ₹1,54,900

  • iPhone 17 Pro (1TB): ₹1,74,900

  • iPhone 17 Pro Max (256GB): ₹1,49,900

  • iPhone 17 Pro Max (512GB): ₹1,69,900

  • iPhone 17 Pro Max (1TB): ₹1,89,900

  • iPhone 17 Pro Max (2TB): ₹2,29,900

iPhone 17
Thumb Pay India: कार्ड, मोबाईल पेमेंट होणार इतिहासजमा? पेमेंटची दुनिया फिंगर-टचवर; भारतात बनलं ThumbPay डिव्हाइस

कुठे खरेदी करता येईल?

Apple चे अधिकृत स्टोअर: पुणे, बेंगळुरू, दिल्ली, मुंबई

ऑनलाइन: Apple च्या वेबसाईटवर तसेच Amazon, Flipkart आणि इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर देखील हा फोन उपलब्ध आहे.

अधिकृत रिटेलर्स: Croma, Vijay Sales, Ingram Micro India, Quick-commerce अॅप्स

प्रमुख ऑफर्स

Ingram Micro India:

  • एक्सचेंज बोनस ₹7,000 पर्यंत

  • 24 महिन्यांसाठी नो-कॉस्ट EMI

  • iPhone 17 वर ₹6,000 इन्स्टंट कॅशबॅक (6 महिने नो-कॉस्ट EMI)

  • iPhone 17 Pro, Pro Max व Air वर ₹4,000 कॅशबॅक

विजय सेल्स :

  • iPhone 17 (256GB) वर ₹6,000 डिस्काऊंट

  • iPhone 17 Pro व Pro Max वर ₹4,000 डिस्काऊंट

  • iPhone Air वर SBI कार्डाने ₹4,000 इन्स्टंट डिस्काऊंट

क्रोमा :

  • iPhone 17 वर ₹6,000 इन्स्टंट डिस्काऊंट

  • सहा महिन्यांसाठी नो-कॉस्ट EMI

  • इतर Pro व Air मॉडेल्सवर ऑफर्स अद्याप घोषित नाहीत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news