Russia Ukraine Energy Ceasefire| रशिया-युक्रेनमध्ये 'एनर्जी सीझफायर'; डोनाल्ड ट्रम्प यांची ट्रुथ सोशलवरुन घोषणा!

दोन्ही देशांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन, दोन्ही देश एकमेकांच्या उर्जा ठिकाणांवर हल्ले करणार नाहीत
Russia Ukraine Energy Ceasefire| रशिया-युक्रेनमध्ये 'एनर्जी सीझफायर'; डोनाल्ड ट्रम्प यांची ट्रुथ सोशलवरुन घोषणा!
Published on: 
Updated on: 

Donald Trump energy ceasefire रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धादरम्यान आता 'ऊर्जा युद्धबंदी' (Energy Ceasefire) जाहीर करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत मोठी घोषणा केली असून हा सीझफायर तात्काळ प्रभावाने लागू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या सिझफायरमध्ये दोन्ही देश एकमेकांच्या उर्जा ठिकाणांवर हल्ले करणार नाहीत. यामुळे जागतिक इंधनटंचाईत दिलासा मिळू शकतो. रशिया-युक्रेन युद्धातील दोन्ही बाजू यावर सहमत झाल्या असून कोणत्याही देशाने या कराराचा भंग करू नये, असे आवाहन ट्रम्प यांनी केले आहे.

ट्रुथ सोशलवर ट्रम्प यांचा दावा

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत या 'एनर्जी सीझफायर'चा दावा केला. दोन्ही देशांनी ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले.

Russia Ukraine Energy Ceasefire| रशिया-युक्रेनमध्ये 'एनर्जी सीझफायर'; डोनाल्ड ट्रम्प यांची ट्रुथ सोशलवरुन घोषणा!
Iran Mock Donald Trump: तेलुगू चित्रपटातील क्लीप शेअर करून इराणनं डोनाल्ड ट्रम्प यांना डिवचलं

झेलेन्सकी यांचे स्पष्टीकरण

या घोषणेपूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी आपली भूमिका मांडली होती. मॉस्कोने युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले थांबवले, तर युक्रेनदेखील रशियन तेल शुद्धीकरण कारखान्यांवर (ऑइल रिफायनरीज) होणारे हल्ले थांबवण्यास तयार आहे, असे झेलेन्स्की यांनी रविवारी स्पष्ट केले होते.

अमेरिका - रशिया डिझेल करारावर झेलेन्की नाराज

झेलेन्स्की म्हणाले, "युरोपातील या युद्धाचे खरे कारण केवळ आणि केवळ रशियाच आहे. ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ले आजपासूनच रोखले जाऊ शकतात, परंतु पुतीन यांची तशी इच्छा नाही." याशिवाय, रशियासोबत ट्रम्प यांनी केलेल्या डिझेल पुरवठा करारावरही झेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त केली होती. अशा करारांमुळे मॉस्कोकडून युक्रेनवर होणाऱ्या हल्ल्यांना प्रोत्साहन मिळेल, असा आरोप त्यांनी केला होता.

अमेरिकेतील डिझेल दरवाढ आणि राजकीय पार्श्वभूमी

दरम्यान, अमेरिकेतील डिझेलच्या वाढत्या किमतींवरून ट्रम्प यांनी युक्रेनला लक्ष्य केले होते. युक्रेनने रशियन रिफायनरीजवर केलेल्या हल्ल्यांमुळेच अमेरिकेत डिझेलचे दर वाढल्याचा आरोप ट्रम्प यांनी शनिवारी केला होता. त्यांनी झेलेन्स्की यांना हे हल्ले तात्काळ थांबवण्यास सांगितले होते. इतकेच नव्हे तर, झेलेन्स्की यांनी मॉस्कोसोबत समझोता करण्याच्या अनेक संधी गमावल्यामुळे युक्रेनने आता आपले नेतृत्व बदलायला हवे, असे वादग्रस्त विधानही ट्रम्प यांनी केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news