First Robot Wedding : रोबोट वर, रोबोट वधू... आणि लग्नही थाटामाटात! हा हायटेक विवाह सोहळा पाहिला आहे का?

रोबोटिक लग्नाने उडवली खळबळ! 'रॉबर्ट' आणि 'मटिल्डा' झाले पती-पत्नी
रोबोट वर, रोबोट वधू... आणि लग्नही थाटामाटात!  हा हायटेक विवाह सोहळा पाहिला आहे का?
रोबोट वर, रोबोट वधू... आणि लग्नही थाटामाटात! हा हायटेक विवाह सोहळा पाहिला आहे का?file photo
Published on
Updated on

russia first robot wedding takes place in moscow pushkin library viral video

पुढारी ऑनलाईन : सोशल मीडियावर सध्या एका अनोख्या रोबोटिक लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. सूट-बूट घातलेला रोबोट वर आणि वेडिंग गाऊनमधील रोबोट वधू यांनी लग्नसोहळ्याची रंगत वाढवली. एवढेच नव्हे, तर वधूच्या नृत्यानेही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

रोबोट वर, रोबोट वधू... आणि लग्नही थाटामाटात!  हा हायटेक विवाह सोहळा पाहिला आहे का?
Social Media impact on children | समाजमाध्यमांच्या विळख्यातील बालपण

रोबोटिक्सच्या जगात दररोज नवनवीन शोध लागत आहेत. कधी रोबोट स्वयंपाक करताना, तर कधी कार चालवताना आपण पाहिले आहेत. युद्धातही सैनिकांच्या भूमिकेत रोबोटचा वापर केला जात आहे. विज्ञानाच्या या प्रगतीमुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, भविष्यात रोबोट माणसांच्या बरोबरीने काम करू शकतील का? कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)च्या युगात हा विषय अधिकच चर्चेत आला आहे. मात्र, या सर्वांपेक्षा वेगळी आणि कल्पनेपलीकडची घटना नुकतीच रशियात घडली. मॉस्को येथे देशातील कदाचित पहिले रोबोटिक लग्न पार पडले.

या लग्नात वर आणि वधू दोघेही रोबोट होते, मात्र त्यांचा विवाह माणसांनी पारंपरिक पद्धतीने लावून दिला. पाहुण्यांनी भरलेल्या सभागृहात सूट परिधान केलेल्या रोबोट वराची आणि वेडिंग गाऊनमधील रोबोट वधूची एंट्री होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, रशियाच्या इतिहासातील हे पहिले रोबोटिक लग्न आहे. या लग्नातील वराचे नाव 'रॉबर्ट', तर वधूचे नाव 'मटिल्डा' असे आहे.

रोबोटिक कुत्र्याने आणली 'जयमाला'

मॉस्कोमधील प्रसिद्ध पुश्किन लायब्ररीमध्ये हा विवाह पारंपरिक शैलीत पार पडला. या लग्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये रॉबर्ट आणि मटिल्डा यांनी खास लग्नाचे पोशाख परिधान केलेले दिसतात. दोघांनी एकमेकांसमोर आधीच प्रोग्राम केलेल्या लग्नाच्या शपथा घेतल्या.

रोबोट वर, रोबोट वधू... आणि लग्नही थाटामाटात!  हा हायटेक विवाह सोहळा पाहिला आहे का?
Relationship Violence | प्रेमाच्या नावानं... क्रौर्याचा हा कोणता हिंस्र चेहरा?

या सोहळ्यात 'डॉगमॅटिक' नावाच्या रोबोटिक कुत्र्यानेही विशेष आकर्षण मिळवले. त्याने लग्नातील ब्रेसलेट्स स्टेजवर आणून दिले. त्यानंतर दोन्ही रोबोट्सनी समन्वयित हालचाली करत एकमेकांना ब्रेसलेट घातले आणि सूत्रसंचालकाने त्यांना "रोबोट पती-पत्नी" म्हणून घोषित केले.

खास दिवशीच का झाला विवाह?

या हाय-टेक लग्नासाठी निवडलेला दिवसही विशेष होता. हा विवाह रशियातील 'डे ऑफ फॅमिली, लव्ह अँड फिडेलिटी' या पारंपरिक उत्सवादरम्यान आयोजित करण्यात आला होता. रशियात दरवर्षी ८ जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस सेंट पीटर आणि मुरोमच्या फेवरोनिया यांच्या स्मरणार्थ पाळला जातो. रशियन ऑर्थोडॉक्स परंपरेनुसार ते निष्ठावान वैवाहिक जीवन आणि आयुष्यभराच्या समर्पणाचे प्रतीक मानले जातात.

रोबोटना खरोखर प्रेम झाले का?

या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. रोबोट माणसांप्रमाणे भावना अनुभवू शकतात का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. मात्र, रोबोट विकसित करणाऱ्या तज्ज्ञांनी आणि आयोजकांनी स्पष्ट केले की, हा संपूर्ण कार्यक्रम पूर्वनियोजित आणि प्रोग्राम केलेला होता.

या लग्नाचा उद्देश रोबोटना भावना आहेत किंवा ते माणसांसारखे प्रेम करू शकतात, हे दाखवणे नव्हते. उलट, आधुनिक घरगुती रोबोट किती प्रगत झाले आहेत, हे दाखवणे हा त्यामागचा हेतू होता. हे रोबोट मानवी मदतीशिवाय संवाद साधू शकतात, आवाज ओळखू शकतात आणि गुंतागुंतीच्या हालचालीही अचूकपणे करू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news