Reliance Industries | अंबानी आणखी एक कंपनी विकत घेणार? ८,९०० कोटींची उलाढाल असलेल्या इलेक्ट्रॉनिक कंपनीसाठी लावणार बोली

Reliance Industries | हायर इंडियाच्या ५१ टक्के भागभांडवलासाठी दावेदारांची चढाओढ
Reliance Industries
Reliance IndustriesCanve Image
Published on
Updated on

मुंबई : ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणे क्षेत्रात कार्यरत असलेल्या हायर इंडियामधील मोठी हिस्सेदारी खरेदी करण्याच्या शर्यतीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आघाडीवर आहे. यासाठी रिलायन्सची थेट स्पर्धा आता सुनील मित्तल यांच्या भारती समूह व इतर भागीदारांच्या कन्सोर्टियमशी होणार आहे.

Reliance Industries
Reliance Industries कंपनीची मोठी झेप! जगातील टॉप 25 कंपन्यांमध्ये समावेश

हायर इंडिया आपल्या भारतीय व्यवसायाचे स्थानिकीकरण करण्याच्या उद्देशाने २५ टक्के ते ५१ टक्के भागभांडवल विकण्याचा विचार करत आहे. दरम्यान, या व्यवहारातून हायरला अंदाजे २ ते २.३ अब्ज डॉलर्स इतके बाजारमूल्य मिळण्याची अपेक्षा आहे. भारतात स्थानिक भागीदार घेण्याचा निर्णय भारत सरकारच्या प्रेस नोट ३ च्या नियमानुसार घेण्यात आला आहे, ज्यामध्ये सीमावर्ती देशांतील कंपन्यांसाठी गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे.

जाणून घ्या, ठळक मुद्दे

  • रिलायन्स व भारती समूहामध्ये हायर इंडियासाठी स्पर्धा.

  • हायर २५% ते ५१% हिस्सा विक्रीसाठी तयार.

  • अंदाजित बाजारमूल्य $२ ते $२.३ अब्ज.

  • प्रेस नोट ३ अंतर्गत स्थानिक भागीदाराची गरज.

  • ग्रेटर नोएडा येथे ₹८०० कोटींची गुंतवणूक.

Reliance Industries
Stock Market Updates | बाजाराची तेजीत सुरुवात, सेन्सेक्स ३०० अंकांनी वाढून खुला, 'हे' शेअर्स फोकसमध्ये

एलजी आणि सॅमसंगनंतर तिसऱ्या क्रमांकावर हायर

हायर इंडिया सध्या भारतीय बाजारात एलजी आणि सॅमसंगनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीने आपल्या उत्पादन क्षमतेचा विस्तार करण्यासाठी ग्रेटर नोएडा येथे ₹७०० कोटींची गुंतवणूक करून एअर कंडिशनर उत्पादन प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, प्रिंटेड सर्किट बोर्डच्या निर्मितीसाठी आणखी ₹१०० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.

वृत्तपत्रात प्रसिध्द केलेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजने वर्षाच्या सुरुवातीला गैर-बाध्यकारी प्रस्ताव म्हणजेच (Non-Binding Offers) सादर केले होत. दरम्यान, त्यांच्या सल्लागारांनी थेट हायरच्या मुख्यालयाशी (Qingdao, चीन) चर्चा केली आहे. दुसरीकडे, सुनील मित्तल यांचा भारती समूह, डाळमिया समूह, वेलस्पन समूह, डाबर कुटुंब, आणि मणिपाल समूहाचे रंजन पाई देखील या व्यवहारात स्वारस्य दाखवत आहेत. तसेच, काही खासगी इक्विटी फंड जसे की टीपीजी, जीआयसी, आणि वॉरबर्ग पिंकस यांनीही भागीदारीसाठी संपर्क साधला आहे.

हायरला भारतात आपला व्यवसाय वाढवायला होणर मदत

जर हा व्यवहार झाला, तर हायर इंडियात एका भारतीय कंपनीचा मोठा वाटा असेल. यामुळे हायरला भारतात आपला व्यवसाय वाढवायला मदत होईल आणि भारतातच जास्त उत्पादन आणि वस्तूंचा पुरवठा करता येईल.

रिलायन्स आणि भारती समूह यांच्यातली ही स्पर्धा फक्त हायरमध्ये भाग मिळवण्यासाठी नाही, तर भारतातील ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स बाजारात आपली ताकद वाढवण्यासाठीही आहे. लवकरच या व्यवहाराबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news