Rare Medical Case : अत्यंत दुर्मिळ..! गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर १७ वर्षांचा युवक चक्क परकीय भाषेत बोलू लागला!

जगभरात आतापर्यंत 'फॉरेन लँग्वेज सिंड्रोम' प्रकारची अधिकृत केवळ नऊ प्रकरणांची नोंद
Rare Medical Case
AI-generated image
Published on
Updated on
Summary

युवकाला शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर उद्भवणाऱ्या 'इमर्जन्स डेलिरियम' (भ्रम अवस्था) मुळे असे घडत असावे. मात्र, अनेक तास उलटूनही जेव्हा तो डच भाषेतील एकही शब्द बोलू शकला नाही, तेव्हा मानसोपचार तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.

Rare Medical Case : वैद्यकीय शास्त्रामध्‍ये चमत्‍काराला थारा नसतो. येथे प्रयोगातून सिद्ध झालेल्या तथ्यांवर आणि विज्ञानाच्या भक्कम पायावरच उपचार केले जातात. मात्र काहीवेळा डॉक्‍टरांना अशा घटना अभुवाव्‍या लागतात की तेही चक्रावून जातात असेच काहीसे एका १७ वर्षीय युवकाच्या गुडघ्यावर सामान्य शस्त्रक्रियेनंतर झालं. आपली डच मातृभाषा पूर्णपणे विसरून हा युवक चक्‍क इंग्रजीत बोलू लागला. या घटनेमुळे वैद्यकीय भाषेत अत्यंत दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या 'फॉरेन लँग्वेज सिंड्रोम'चे (Foreign Language Syndrome) सध्‍या चर्चेचा विषय ठरले आहे.

शस्त्रक्रियेनंतर काय घडले?

एका युवक फुटबॉल खेळताना जखमी झाला. त्‍याला गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मात्र, ॲनेस्थेशियाचा (भूल) अंमल ओसरल्यानंतर तरुण शुद्धीवर आला, तेव्हा त्याने आपली मातृभाषा डच भाषेऐवजी केवळ इंग्रजीत संवाद साधण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे, तर आपण अमेरिकेत असल्याचे तो वारंवार सांगत होता.

Rare Medical Case
Normal range medical tests | ‘नॉर्मल रेंज’ला भुलू नका

युवकाने पालकांनाही ओळखले नाही

धक्कादायक बाब म्हणजे, युवकाने आपल्या पालकांना ओळखण्यासही नकार दिला. त्याला डच भाषा बोलता येत नव्हती आणि समोरचे डच भाषेत काय बोलत आहेत, हे देखील समजत नव्हते. तो इंग्रजी भाषा केवळ शाळेत शिकला होता, मात्र आता तो केवळ त्याच भाषेत संवाद साधत होता. सुरुवातीला परिचारिकांना वाटले की, भूल दिल्यानंतर उद्भवणाऱ्या 'इमर्जन्स डेलिरियम' (भ्रम अवस्था) मुळे असे घडत असावे. मात्र, अनेक तास उलटूनही जेव्हा तो डच भाषेतील एकही शब्द बोलू शकला नाही, तेव्हा मानसोपचार तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.

Rare Medical Case
Calendar 2026 : इंग्रजी कॅलेंडर आणि हिंदू दिनदर्शिकेमध्ये नेमका फरक कोणता? जाणून घ्या सविस्तर

मेंदूत कोणतेही दोष आढळले नाहीत

तपासणीदरम्यान तो मुलगा शांत होता; पण तो बोलताना सर्व संवाद डच हेल काढून इंग्रजीत सुरू होते. कालांतराने तो डचमध्ये छोटी उत्तरे देऊ लागला, पण त्याला आपली मातृभाषा डच भाषा बोलणे अत्यंत कठीण जात होते. न्यूरोलॉजिस्टनी केलेल्या तपासणीत त्याच्या मेंदूत कोणतेही दोष आढळले नाहीत. शस्त्रक्रियेनंतर सुमारे १८ तासांनी त्याला डच भाषा समजू लागली, पण बोलता येत नव्हती. दुसऱ्या दिवशी त्याचे मित्र त्याला भेटायला आले. त्यांच्याशी बोलताना अचानक त्याची डच बोलण्याची क्षमता परत आली. त्याची प्रकृती पूर्णपणे सुधारल्याने डॉक्टरांनी त्याला तीन दिवसांनी डिस्चार्ज दिला.

Rare Medical Case
Priyanka Gandhi's son Engagement : प्रियंका गांधींच्‍या पुत्राचे लग्‍न ठरलं, जाणून घ्‍या कोण आहे अवीवा बेग?

'फॉरेन लँग्वेज सिंड्रोम' म्हणजे काय?

वैद्यकीय शास्‍त्रानुसार, जगभरात आतापर्यंत 'फॉरेन लँग्वेज सिंड्रोम'ची केवळ नऊ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. हा विकार 'फॉरेन एक्सेंट सिंड्रोम'पेक्षा वेगळा आहे. यात रुग्ण केवळ परकीय हेल काढत नाही, तर आपली मातृभाषा विसरून पूर्णपणे दुसऱ्याच भाषेत बोलू लागतो. एका किशोरवयीन मुलामध्ये आढळलेले हे अशा प्रकारचे पहिलेच अधिकृत प्रकरण मानले जात आहे. हा सिंड्रोम नेमका कशामुळे होतो, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा मध्यवर्ती मज्जासंस्थेवर होणारा परिणाम याचे कारण असू शकते, असा संशोधकांचा प्राथमिक अंदाज आहे. दिलासादायक बाब म्हणजे, ही स्थिती तात्पुरती असते आणि रुग्ण पुन्हा पूर्णपणे बरा होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news