China Flash Marriage : चीनच्या ‘वन चाइल्ड पॉलिसी’ मुळे अविवाहित तरूणांचे आयुष्य का होतंय उद्धवस्त?

‘फ्लॅश मॅरेज’च्या जाळ्यात अडकले चीनी तरुण; लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक
 bachelors chinese lonely men scammed by fake brides
चीनमध्ये मुलींची मोठी कमतरता, आता वधूच्या शोधात अविवाहित तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त; फसवणुकीचे प्रकार वाढलेfile photo
Published on
Updated on

quest for bride in china turning ugly for bachelors chinese lonely men scammed by fake brides

पुढारी ऑनलाईन : चीनमध्ये दीर्घकाळ ‘वन चाइल्ड पॉलिसी’ लागू होती. या धोरणामुळे देशात महिलांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. आता अनेक तरुणांना लग्नासाठी वधू मिळणे कठीण झाले आहे. या संकटाचा फायदा घेत काही ठिकाणी तरुणांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

 bachelors chinese lonely men scammed by fake brides
Most Expensive House : मुंबईला टक्कर देणारं गुरुग्रामचं लक्झरी मार्केट; 271 कोटींच्या पेंटहाऊस डीलची जोरदार चर्चा

चीनमध्ये अनेक दशकांपासून लागू असलेल्या ‘वन चाइल्ड पॉलिसी’ने आता देशातील तरुणांसमोर मोठे संकट उभे केले आहे. एकुलते मूल मुलगा असावे, या मानसिकतेमुळे आज चीनमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या सुमारे 3 कोटींनी अधिक झाली आहे. त्यामुळे अनेक तरुणांना लग्नासाठी वधू मिळत नाही. अनेक जण मुलीच्या शोधात भटकत आहेत.

याच परिस्थितीचा फायदा आता फसवणूक करणारे घेत आहेत. चीनमध्ये अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये ‘फ्लॅश मॅरेज’ म्हणजेच तातडीने लग्न लावून देण्याचे आश्वासन देणाऱ्या बनावट विवाह संस्था आणि मॅरेज ब्युरो अविवाहित तरुणांना लक्ष्य करत आहेत.

बीबीसीच्या एका वृत्तानुसार, अशा एजन्सी काही दिवसांतच साधी आणि घरगुती मुलगी लग्नासाठी मिळवून देण्याचे आश्वासन देतात. त्याबदल्यात पुरुषांकडून लाखो युआन उकळले जातात. मात्र, लग्न झाल्यानंतर काही दिवसांत किंवा महिन्यांत नववधू पैसे घेऊन फरार होते. काही वेळा तर संपूर्ण लग्नच बनावट असल्याचे समोर येते. या परिस्थितीमुळे चीनमधील तरुणांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.

 bachelors chinese lonely men scammed by fake brides
'देशाची किती मोठी फसवणूक करत आहेत...', कंगना रनौत यांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल

37 वर्षीय वांग झुआंग यांची आपबीती

अशीच एक घटना 37 वर्षीय वांग झुआंग यांच्यासोबत घडली. या वयापर्यंत त्यांनी लग्नाची आशाच जवळपास सोडून दिली होती. मात्र, एके दिवशी त्यांना एका मॅरेज एजन्सीची जाहिरात दिसली. अखेर आपला वधूचा शोध संपणार, असे त्यांना वाटले.

एजन्सीने चांगली मुलगी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वांग यांनी एजन्सीची फी, वधूसाठीची रक्कम आणि लग्नाचा खर्च मिळून सुमारे 44 हजार डॉलर दिले.

एजन्सीने वांग यांची एका महिलेशी केवळ 8 ते 10 मिनिटांच्या 4-5 भेटी घडवून आणल्या आणि त्यानंतर त्यांना लग्नासाठी तयार केले. मात्र, लग्नाच्या काही महिन्यांनंतर वांग यांना कर्ज वसुली करणाऱ्यांचे फोन येऊ लागले.

तपास केल्यानंतर त्यांना धक्कादायक सत्य समजले. संबंधित महिलेचे यापूर्वी तीन विवाह झाले होते आणि तिला तीन मुले होती. तसेच तिला गंभीर लैंगिक आजार असल्याचेही समोर आले. ती मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली होती.

सत्य समोर आल्यानंतर महिलेने घटस्फोट घेण्याची तयारी दर्शवली; मात्र वांग यांनी दिलेले पैसे परत करण्यास तिने नकार दिला. अखेर वांग यांनी मॅरेज एजन्सीच्या कार्यालयात धाव घेतली. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर त्यांना आणखी एक धक्का बसला. ज्या एजन्सीला त्यांनी पैसे दिले होते, तिचे कार्यालयच तिथे अस्तित्वात नव्हते.

चीनमध्ये मुलींची कमतरता का निर्माण झाली?

चीनमध्ये दीर्घकाळ लागू असलेल्या ‘वन चाइल्ड पॉलिसी’मुळे देशात महिलांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. सध्या चीनमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या सुमारे 3 कोटींनी अधिक असल्याचे सांगितले जाते.

यामुळे वधूच्या कुटुंबीयांची मागणीही वाढली आहे. विशेषतः लहान शहरे आणि ग्रामीण भागात लग्नासाठी पुरुषांकडून घर, कार, कौटुंबिक व्यवसाय आणि मोठ्या प्रमाणात ‘ब्राइड प्राइस’ म्हणजेच वधूसाठी मोठी रक्कम मागितली जाते.

या परिस्थितीचा फायदा घेत काही मॅरेज एजन्सी तरुणांना आकर्षित करण्यासाठी ‘3 दिवसांची भेट, 3 वर्षांच्या डेटिंगपेक्षा चांगली’ अशा प्रकारच्या जाहिराती करत आहेत. लग्नाची तीव्र इच्छा असलेल्या तरुणांना या जाहिरातींच्या माध्यमातून जाळ्यात ओढले जाते आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news