PSG Fans Clash Paris | पॅरिसमध्ये PSG च्या विजयानंतर राडा! फुटबॉल फॅन्स आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री

पॅरिसच्‍या रस्‍त्‍यांवर कडक बंदोबस्‍तानंतरही हिंसाचार, ७९ हुल्लडबाजांना अटक
फ्रांसमध्ये पीएसजी (PSG) फुटबॉल संघाच्या विजेतेपदानंतर पॅरिसच्या रस्त्यांवर जोरदार राडा झाला.
फ्रांसमध्ये पीएसजी (PSG) फुटबॉल संघाच्या विजेतेपदानंतर पॅरिसच्या रस्त्यांवर जोरदार राडा झाला.
Published on
Updated on

PSG Fans Clash Paris

पॅरिस : फ्रान्‍समध्ये पीएसजी (PSG) फुटबॉल संघाच्या विजेतेपदानंतर पॅरिसच्या रस्त्यांवर जोरदार झाला. सुरक्षेचे कडक बंदोबस्त असूनही फुटबॉल फॅन्स आणि पोलिसांमध्ये हिंसक चकमक झाली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ७९ हुल्लडबाजांना ताब्यात घेतले आहे.

सामन्‍यानंतर विजयाचा जल्‍लोष सुरु असताना हिंसाचार

पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री लॉरेंट नुनेज यांच्या सूचनेनुसार संपूर्ण फ्रांसमध्ये २२,००० पोलीस तैनात करण्यात आले होते, ज्यापैकी ८,००० पोलीस एकट्या पॅरिसमध्ये तैनात होते. पेनल्टी शूटआऊटमधील नाट्यमय विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी चाहत्यांची अलोट गर्दी शहराच्या नामांकित चॅम्प्स-एलिसी एव्हेन्यूवर जमा झाली होती. 'PSG'च्या पेनल्टी शूटआऊटमधील थरारक विजयाचा जल्लोष सुरू असतानाच काही भागांतून हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटना समोर आल्या आहेत. हा हिंसाचार रोखण्यासाठी पॅरिसमधील ट्राम सेवा थांबवण्यात आली, अनेक मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आणि काही ठिकाणी बस वाहतूकही रोखण्यात आली. पोलिसांनी कारवाई करत ७० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे.

फ्रांसमध्ये पीएसजी (PSG) फुटबॉल संघाच्या विजेतेपदानंतर पॅरिसच्या रस्त्यांवर जोरदार राडा झाला.
Delhi Assembly security breach | दिल्ली विधानसभेच्या परिसरात अज्ञात कारचा गेट तोडून शिरकाव; तिघे ताब्‍यात, एकाला अटक

'पार्क डेस प्रिन्सेस' स्टेडियमबाहेर राडा

पॅरिस पोलिसांच्या मते, सामन्यादरम्यान 'पार्क डेस प्रिन्सेस' स्टेडियमबाहेर प्रचंड गदारोळ झाला. ४,००० ते ५,००० लोकांनी पोलीस अधिकाऱ्यांवर दगडफेक केली, ज्यामध्ये एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. सुमारे १५० हुल्लडबाजांनी एका गेटमधून जबरदस्तीने आत घुसण्याचा प्रयत्न केला, जो सुरक्षा दलांनी हाणून पाडला. या गोंधळात स्टेडियमजवळ असलेली एक बेकरी आणि एका रेस्टॉरंटचे मोठे नुकसान झाले आहे.

फ्रांसमध्ये पीएसजी (PSG) फुटबॉल संघाच्या विजेतेपदानंतर पॅरिसच्या रस्त्यांवर जोरदार राडा झाला.
Vidarbha Express: विदर्भ एक्स्प्रेसमध्ये 32 लाखांची सॅक चोरी; झोपेत असलेल्या प्रवाशाला फटका

मागील वर्षी प्रमाणे यंदाही सुरक्षेचे कडक बंदोबस्त धुडकावले

गेल्या वर्षी PSG च्या विजयानंतर झालेल्या दंगलीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन यंदा प्रशासनाने सुरक्षेची चोख व्यवस्था केली होती. पॅरिसमधील ट्राम लाईन्स, अनेक मेट्रो स्टेशन्स आणि बस वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. असे असूनही, 'चॅम्प्स-एलिसीज एव्हेन्यू'वर (Champs-Élysées Avenue) सुमारे २०,००० लोकांची गर्दी जमली. या गर्दीने पोलिसांवर फटाके आणि जळत्या फ्लेअर्स (मशाल) फेकल्या. प्रत्युत्तरात पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या आणि ७९ जणांना ताब्यात घेतले, ज्यांपैकी ४५ जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

फ्रांसमध्ये पीएसजी (PSG) फुटबॉल संघाच्या विजेतेपदानंतर पॅरिसच्या रस्त्यांवर जोरदार राडा झाला.
Terror Link Busted: इसिस आणि जैश-ए-मोहम्मदच्या संपर्कातील दोन संशयित ताब्यात

पोलिसांनी फटाके केले जप्त

पोलिसांनी कारवाई करत या उपद्रवी लोकांकडून दोन डझन फ्लेअर्स आणि सुमारे १०० फटाके जप्त केले. यादरम्यान, हुल्लडबाजांनी चॅम्प्स-एलिसीज एव्हेन्यूजवळील एक बस शेल्टर पूर्णपणे उद्ध्वस्त केले आणि भाड्याच्या सायकली (रेंटल बाईक्स) रस्त्यावर टाकून पोलिसांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स तयार करण्याचा प्रयत्न केला. या हिंसाचारात सहा वाहने आणि दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांचे (दुकान/ऑफिस) नुकसान झाले आहे. पोलीस प्रवक्त्याने निवेदन जारी करत म्हटले की, "सर्वांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि शांततापूर्ण उत्सव सुनिश्चित करणे ही आमची जबाबदारी आहे, ज्यासाठी अत्यंत मजबूत आणि कडक सुरक्षा यंत्रणा लागू करण्यात आली आहे."

फ्रांसमध्ये पीएसजी (PSG) फुटबॉल संघाच्या विजेतेपदानंतर पॅरिसच्या रस्त्यांवर जोरदार राडा झाला.
Ines Faria Mumbai Video: 'मॅम, एक सेल्फी फक्त…’ मुंबईत आलेल्या विदेशी इन्फ्लुएन्सर तरुणीचा फोटोसाठी पाठलाग; व्हिडिओ व्हायरल

व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

गेल्या वर्षी पीएसजीच्या विजयानंतर तरुणांनी चॅम्प्स-एलिसीज आणि इतर रस्त्यांवरील दुकाने पूर्णपणे लुटली होती, त्यानंतर शेकडो लोकांना अटक झाली होती. यंदा तोच इतिहास पुन्हा घडू नये म्हणून दुकानदारांनी सामना सुरू होण्यापूर्वीच आपल्या दुकानाच्या खिडक्या आणि दरवाजांवर लाकडी बोर्ड लावून सुरक्षेची काळजी घेतली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news