

• हे दोन्ही संशयित तरुणदहशतवादी संघटनांमध्ये सामीलहोणाऱ्या तरुणांचे ऑनलाईन ब्रेनवॉशिंग करण्यासाठी समाजमाध्यमआणि एनक्रिप्टेड मेसेजिंगप्लॅटफॉर्मचा वापर करत असल्याचासंशय दिल्ली पोलिसांना आहे.त्यानुसार अधिक चौकशीसाठीदिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यातघेऊन दिल्ली येथे नेले आहे.
कुर्ला: इसिस आणि जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानीदहशतवादी संघटनांच्या संपर्कात असलेल्या दोन संशयित तरुणांना कुर्ला आणि खडवली परिसरातूनताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्र एटीएस आणिदिल्ली पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली असून यादोघांकडून अधिकाऱ्यांनी मोबाईल फोन आणि लॅपटॉपआणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहेत.
पाकिस्तानमधील इसिस आणि जैश-ए-मोहम्मदया दहशतवादी संघटनेच्या काही सदस्यांना काही महिन्यांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनेओडिशा येथून अटक केली होती. यावेळी या आरोपींचेधागेदोरे मुंबईपर्यंत असल्याची माहिती दिल्लीपोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार काही दिवसांपूर्वीदिल्ली पोलीस आणि एटीएसने गोवंडी परिसरातदेखील छापे घालत एकाला ताब्यात घेतले होते. यातपासातून रविवारी पुन्हा एकदा दिल्ली पोलीस आणिमहाराष्ट्र एटीएस यांनी कुर्ला पश्चिम आणि खडवलीयेथे छापे घातले.यामध्ये दोघांना ताब्यात घेण्यातआले आहे.