

PM Modi Birthday Giorgia Meloni :
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशापाठोपाठ जगभरातील नेत्यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र यामध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींनी दिलेल्या शुभेच्छांनी खास लक्ष वेधून घेतले आहेत. मेलोनी यांनी खास ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी नरेंद्र मोदी यांना प्रेरणेचा स्त्रोत अन् लाखो लोकांचं नेतृत्व करण्याची क्षमता असं म्हणत गुणगाण केलं आहे.
जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून नरेंद्र मोदी आणि स्वतःचा एक फोटो शेअर केला. या फोटोत मेलोनी या नरेंद्र मोदी यांच्यासोबत सेल्फी घेताना दिसत आहेत. दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य असून मोबाईल मेलोनी यांनी धरला आहे. या फोटोवरून या दोन्ही जागतिक नेत्यांमधील रॅपो दिसून येतो.
दरम्यान, या फोटोला मेलोनी यांनी, 'मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. त्यांची ताकद, त्यांचा निश्चय आणि लाखो लोकांचे नेतृत्व करण्याची क्षमता ही प्ररणेचा स्त्रोत आहे. मित्रत्व आणि सन्मानाच्या भावनेतून मी त्यांच्यासाठी चांगलं आरोग्य आणि उर्जा चिंतते. भारताला उज्वल भविष्याकडे घेऊन जाण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील नातं अजून दृढ करण्यासाठी त्यांना चांगला आरोग्य लाभो अशा शुभेच्छा देते.'
जगभरातील अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा देखील समावेश आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोव करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी यो दोन प्रमुख नेत्यांनी जागातील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यात युक्रेन आणि रशिया संघर्ष आणि भारत अमेरिका यांच्यातील संबंधांचा देखील समावेश होता.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर पोस्ट केली की, 'माझे मित्र नरेंद्र मोदी यांच्यासोबत नुकताच एक चांगला फोन कॉल झाला. मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते जबरदस्त काम करत आहेत. नरेंद्र... रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल आभार!
याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटवर पोस्ट करत उत्तर दिलं. त्यांनी 'माझे मित्र अध्यक्ष ट्रम्प यांचे फोनवरून माझ्या ७५ व्या वाढदिवसादिवशी शुभेच्छा दिल्याबद्दल आभार.' असं ट्विट केलं. याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटोनी अल्बान्से यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.