Fatty Liver Drug :
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन डिएगो स्कूल ऑफ मेडिसीन यांनी नव्या अंडर ट्रायल औषधाबाबत एक मोठा दावा केला आहे. या दाव्यानुसार गंभीर फॅटी लिव्हरवर देखील या औषधाचा चांगला परिणाम होत आहे असं अभ्यासात आढळून आलं आहे. फॅटी लिव्हर हा आजार लठ्ठपणा आणि टाईप २ डायबेटीसशी संबंधित आहे. फॅटी लिव्हरमुळं लिव्हर सिरॉयसिस देखील होऊ शकतो. त्यामुळं लिव्हर फेल्युअर आणि लिव्हरचा कॅन्सर देखील होण्याची शक्यता आहे.
द लान्सेटच्या ऑनलाईन एडिशनमध्ये एक स्टडी प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये ION224 हे औषध DGAT2 या लिव्हर एन्झायमला लक्ष्य करतं. हे एन्झायम लिव्हरच्या फॅट निर्मिती आणि स्टोअरमध्ये महत्वाची भूमिका बजावतं. हे औषध एन्झायमला ब्लॉक करतं त्यामुळं लिव्हरभोवती फॅट जमा होणं कमी करतं. या लिव्हर फॅटमुळं लिव्हर डॅमेज होतं.
दरम्यान, या अभ्यासाचे प्रमुख संशोधक आणि सॅन डिएगो स्कूल ऑफ मेडिसीनमधील गॅस्ट्रोइन्ट्रोलॉजी विभागाचे प्रमुख रोहित लूम्बा यांनी सांगितलं की, 'या अभ्यासामुळं लिव्हर संदर्भातील गंभीर आजारांविरूद्ध लढण्याबाबत एक मोठं पाऊल पुढं पडलं आहे.
ते म्हणाले की, DGAT2 हे एन्झायम ब्लॉक केल्यानं लिव्हर संदर्भातील गंभीर आजाराच्या प्रोसेसलाच अळा बसतो. यामुळं लिव्हरमध्ये फॅट जमा होणं कमी होतं.
या औषधाचा अभ्यास करण्यासाठी अनेक सेंटर्सचा वापर करण्यात आला, यातील दुसऱ्या क्लिनिकल ट्रायलसाठी अमेरिकेतील १६० लिव्हरशी संदर्भात गंभीर आजार असलेल्या लोकांचा समावेश करण्यात आला. या ट्रायलमधील रुग्णांना महिन्याला इंजक्शन देण्यात आले. यावेळी वेगवगेळे डोसेस देण्यात आले. हा इंजक्शनचा कोर्स एक वर्षासाठी देण्यात आला.
उच्च डोस देण्यात आलेल्या ६० टक्के रूग्णांच्या लिव्हर हेल्थमध्ये सुधारणा झाल्याचं आढळून आलं. या औषधांचा फायदा हा वजन कमी करण्यासाठी झाला. त्यामुळं हे औषध इतर थेअरपिसोबत देता येऊ शकतं हे या अभ्यासात दिसून येत आहे. याचबरोबर क्लिनिकल ट्रायल दरम्यान या औषधाचे गंभीर असे कोणतेही साईड इफेक्ट दिसून आलेले नाहीत.
MASH हे यापूर्वी नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणून ओळखले जात होते. फॅटी लीव्हरमुळं ओबेसिटी आणि टाईप २ डायबेटिसचा धोका निर्माण होत होता. फॅटी लिव्हर सायलेंट आजार म्हणून देखील ओळखला जातो. कारण अनेक वर्षे कोणतीही लक्षणं न दिसता ही हा आजार वाढू शकतो.
अमेरिकेत जवळपास १० कोटींपेक्षा जास्त लोकांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा फॅटी लिव्हरचा त्रास आहे. तर जगातील ४ लोकांपैकी एका व्यक्तीला फॅटी लिव्हरची समस्या आहे. जर यावर उपचार केला नाही तर लिव्हर फेल्युअर देखील होऊ शकत. त्यानंतर त्यावर लिव्हर ट्रान्सप्लाट हा एकमेव उपाय राहतो.
दरम्यान, रोहित लूम्बा यांनी सांगितलं की, हे पहिलं असं औषध आहे जे फॅटी लिव्हरवर बायोलॉजिकल इम्पॅक्ट करत. जर हे क्लिनिकल ट्रायल फेज ३ मध्ये कन्फर्म झाले तर रूग्णांना आम्ही टार्गेटेड थेअरपी देऊ शकतो. यामुळं लिव्हर डॅमेज जीवघेण्या स्थितीपर्यंत पोहचण्यापूर्वीच रिव्हर्स होऊ शकतं.