खलिस्तानी दहशवादी पन्‍नूच्‍या हत्‍येचा कट: निखिल गुप्ताचे अमेरिकेला प्रत्यार्पण

खलिस्‍तानी दहशतवादी पन्‍नू. 
(संग्रहित छायाचित्र)
खलिस्‍तानी दहशतवादी पन्‍नू. (संग्रहित छायाचित्र)

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : खलिस्‍तानी दहशतवादी पन्‍नू याची कॅनडामध्‍ये हत्‍येचा कट रचल्याचा आरोप असलेला भारतीय नागरिक निखिल गुप्ता याचे चेक रिपब्लिकमधून अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यात आले आहे. न्यूयॉर्कमध्‍ये पन्नूच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप निखिल गुप्तावर आहे.

अमेरिकन जिल्हा न्यायालयाच्‍या सूत्रांनी म्‍हटलं आहे की, निखिल गुप्ता सोमवारी ( दि. १७) मॅनहॅटन येथील न्यायालयात हजर होणार आहेत. 52 वर्षीय गुप्ता हा भारत सरकारचा सहयोगी असून, त्याने न्यूयॉर्कमध्ये पन्नूच्या हत्येचा कट रचण्यात इतरांसह मदत केल्याचा आरोप अमेरिकेच्या न्याय विभागाने केला आहे.

निखिलवर अनेक आरोप

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुप्ता यांना जून 2023 मध्ये चेक रिपब्लिकमध्ये अटक केली होती. त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. पन्नू हा भारताने घोषित केलेला दहशतवादी असून त्याच्याकडे अमेरिका आणि कॅनडाचे नागरिकत्व आहे.

नोव्हेंबरच्या सुरुवातीला अमेरिकेच्या न्याय विभागाने खलिस्तान समर्थक दहशतवादी आणि न्यूयॉर्कस्थित पन्नू यांच्या हत्येच्या अयशस्वी कटात सहभाग असल्याबद्दल भारतीय नागरिकाविरुद्ध आरोपपत्र जारी केले होते.मॅनहॅटनमधील फेडरल कोर्टात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात ओळख नसलेल्या भारतीय सरकारी कर्मचाऱ्याने ही हत्या करण्यासाठी हिटमॅनची नियुक्ती केली होती, जी अमेरिकन अधिकाऱ्यांनी अयशस्वी केली होती, असे म्‍हटलं आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news