अमेरिकेतील भारतीय दुतावासावर खलिस्‍तानींचा हल्‍ला; मध्यरात्री लावली आग | पुढारी

अमेरिकेतील भारतीय दुतावासावर खलिस्‍तानींचा हल्‍ला; मध्यरात्री लावली आग

पुढारी ऑनलाईन ; खलिस्तानी समर्थकांनी अमेरिकेतील भारतीय दूतावासाला आग लावली. सिख फॉर जस्टिसचा दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने ८ जुलैपासून परदेशातील भारतीय दूतावासांना घेराव घालण्याची घोषणा केल्यानंतर ही घटना घडली आहे. एफबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही खलिस्तानी समर्थकांनी शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, भारतीय दूतावासात आग लागल्याची घटना २ जुलैच्या रात्रीची आहे.

एफबीआयकडून भारतीय दूतावासावरील हल्ल्याची चौकशी सुरू

सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासाला खलिस्तानी समर्थकांनी लक्ष्य केले होते. मात्र, यात भारतीय दूतावासाचे फारसे नुकसान झाले नाही, ही दिलासादायक बाब आहे. आग काही वेळातच आटोक्यात आली, त्यानंतर एफबीआयनेही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. रविवारी (स्थानिक वेळेनुसार) सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासात खलिस्तान समर्थकांकडून कथित तोडफोड आणि जाळपोळ करण्याच्या प्रयत्नाचा युनायटेड स्टेट्सने मंगळवारी “तीव्र निषेध” केला.

खलिस्तानी कट्टरवाद्यांनी पहाटे दीड ते अडीचच्या दरम्यान भारतीय दूतावासाला आग लावल्याचे स्थानिक चॅनल दिया टीव्हीने वृत्त दिले आहे. पण सॅन फ्रान्सिस्को अग्निशमन विभागाने ती आग तातडीने विझवली. या घटनेत अधिक नुकसान झाले नसून कोणीही जखमी झालेले नाही. कथितरित्या खलिस्तान समर्थकांनी या घटनेसंदर्भात एक व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडिओमध्ये गेल्या महिन्यात कॅनडात मारला गेलेला दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचा बदला असे वर्णन करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button