

Bangladesh In Islamic NATO: तुर्कीचे वर्तमानपत्र येनी शफाकने एक वृत्त छापून पाकिस्तान आणि तुर्की बांगलादेशलाही आपल्या गटात खेचण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चेला चांगलीच हवा दिली. या वर्तमानपत्राने एका लेखात जर बांगलादेश हा सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्की यांच्या सुरक्षा सहकार्य करारात सामील झाला तर याचा दक्षिण आशियाच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार असल्याचं भाकीत नोंदवलं आहे. या लेखात बांगलादेशला या फ्रेमवर्कमध्ये सामील करण्याबाबत अजून अधिकृत निर्णय झालेला नाही.
येनी शफाफच्या म्हणण्यानुसार जर ढाका या संरक्षण करारात सामील होते तर त्याच्या परराष्ट्र धोरणात बदल होत आहे हा एक मोठा संकेत असेल. या वर्तमानपत्राच्या म्हणण्यानुसार बांगलादेश बांगलादेश भारतावरील आपली पारंपरिक अवलंबत्व कमी करत चीन, भारत आणि पश्चिमी देशांसोबतच्या रिलेशनशिवाय नवा पर्याय चाचपू शकतो. वृत्तात हे कोणत्या एका देशाच्या विरूद्ध थेट पाऊल नाही. मात्र आपली रणनैतिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न असे दाखवण्यात आलं आहे.
या लेखानुसार पाकिस्तान आणि तुर्की बांगलादेशसोबत संरक्षण सहकार्य वाढवण्यामध्ये रस ठेवतो. विशेष करून तुर्कीचे ड्रोन आणि संरक्षण तंत्रज्ञान बांगलादेशसाठी आकर्षणाचा एक केंद्रबिंदू ठरू शकतो. बांगलादेश आणि तुर्की यांच्यात पहिल्यापासून संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा सुरू आहे. दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवण्यासाठी अनेक पावले देखील उचलण्यात आली आहेत.
या लेखातील विश्लेषणात भारताबाबत विशेष उल्लेख करण्यात आला आहे. जर बांगलादेश इस्लामिक नाटोच्या जवळ जातो तर भारताकडे बांगलादेशसोबतच्या आपल्या नात्याकडे एका वेगळ्या दृष्टीकोणातून पहावं लागेल. भारत आणि बांगलादेश हे जवळपास ४ हजार ९६ किलोमीटरची सीमा शेअऱ करतात. व्यापार, नद्यांचे पाणीवाटप बंगालच्या खाडीबाबतचे निर्णय याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
या वृत्तपत्रानुसार तुर्कीचे संरक्षण तंत्रज्ञान, पाकिस्तानचा लष्करी अनुभव बांगलादेशची सैन्य क्षमता वाढवण्यास मदत करू शकते. त्यानंतर भारताला आपल्या पूर्व समुद्री भागावर रणनैतिक समिकरणांवर करडी नजर ठेवावी लागणार आहे.