Pakistan terror attack : पाकिस्तानात दहशतवादी हल्ला; बेछूट गोळीबारात ९ पोलीस ठार

पाच जवानांचे अपहरण, चकमकीत १५ दहशतवादी ठार
Pakistan terror attack
Pakistan terror attackPudhari
Published on
Updated on

Pakistan terror attack : पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. झियारत जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका पोलीस चौकीवर हल्ला केला आणि बेछूट गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात दोन एसएचओ (SHO) सह 9 पोलीस कर्मचारी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांनी पाच जवानांचे अपहरण केल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर लगेचच सुरक्षा दलांनी केलेल्‍या कारवाईत 15 दहशतवादी ठार झाले आहेत.

हल्‍लेखोरोंनी केले पोलीस चौकीला लक्ष्‍य

दहशतवादी हल्‍ल्‍याच्‍या घटनेला दुजोरा देताना झियारतचे पोलीस अधीक्षक अब्दुल कुद्दूस यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी मांगी फेज-3 भागात असलेल्या पोलीस चौकीला लक्ष्य केले. रात्रभर सुरू असलेला गोळीबार अत्यंत भीषण होता. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला.

Pakistan terror attack
PoK Protest Violence : 'पीओके'मध्ये आंदोलकांवर सुरक्षा दलांचा गोळीबार; ३० हून अधिक ठार, २०० जण जखमी

हल्ल्यामागे 'टीटीपी'चा हात?

बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांचे माहिती सल्लागार शाहिद रिद यांनी सांगितले की, मांगी भागात दहशतवाद्यांविरुद्ध राबवण्यात आलेले क्लिअरन्स ऑपरेशन पूर्ण झाले आहे. या मोहिमेत फ्रंटियर कोअर, बलुचिस्तान पोलीस, काउंटर टेररिझम डिपार्टमेंट, स्पेशल ऑपरेशन्स विंग आणि अँटी-टेररिझम फोर्स यांनी भाग घेतला होता.या कारवाईत 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (TTP) चे 15 दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांविरुद्ध इंटेलिजन्स आधारित (गुप्तचर माहितीवर आधारित) मोहिमा आणखी तीव्र केल्या जातील, असेही रिद म्हणाले.

Pakistan terror attack
Pakistan-Occupied Kashmir | पीओकेमध्ये शांततापूर्ण निदर्शनावेळी आंदोलकांवर गोळीबार; अनेक जखमी

पाच जवानांचे अपहरण

अपहरण केलेल्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू असून संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्‍यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनीही या हल्ल्याचा निषेध करत शहीदांना श्रद्धांजली वाहिली.

Pakistan terror attack
Ayatollah Khamenei death |खामेनींच्‍या मृत्यूनंतर पाकिस्तानात अमेरिकन दूतावासावर हल्‍ला, गोळीबारात १० आंदोलकांचा मृत्यू

परिसरात तणाव, महामार्ग रोखले

हल्ल्याची बातमी पसरताच झियारत आणि आजूबाजूच्या परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्थानिक जमाती, ट्रान्सपोर्टर्स, व्यापारी आणि शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. आंदोलकांनी बलुचिस्तानला पंजाब आणि खैबर पख्तूनख्वाशी जोडणारे मुख्य राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे रोखून धरले. यामुळे शेकडो प्रवासी बसेस आणि मालवाहू वाहने रस्त्यावर अडकून पडली आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाने अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news