Pakistan-Occupied Kashmir | पीओकेमध्ये शांततापूर्ण निदर्शनावेळी आंदोलकांवर गोळीबार; अनेक जखमी

पाक सुरक्षा दलांनी बॉम्बही फेकले
Pakistan-Occupied Kashmir |
मुझ्झफराबाद : जम्मू-काश्मीर जॉईंट अवामी ॲक्शन कमिटीच्या (जेएएसी) वतीने व्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) रविवारी आयोजित केलेल्या रॅलीत मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते.
Published on
Updated on

मुझ्झफराबाद; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीर जॉईंट अवामी ॲक्शन कमिटीच्या (जेएएसी) वतीने व्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) रविवारी आयोजित शांततापूर्ण निषेध रॅलीवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला. यात अनेक आंदोलक जखमी झाले.

महागाई, भरमसाट मालमत्ता कर यांसह या भागात पाकिस्तान सरकारला आलेले प्रशासकीय अपयश, अटक करण्यात आलेले जेएएसीच्या कोअर कमिटीचे सदस्य शौकत नवाज मीर यांच्या आणि आंदोलकांची त्वरित सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. मात्र आंदोलन पाकिस्तानने बळाच्या जोरावर चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जेएएसीने केला आहे. 'एएनआय'च्या वृत्तानुसार अब्बासपूर येथील सरदार गुलाम हुसेन खान स्पोर्टस्‌ स्टेडियममध्ये सुमारे ४० हजार लोक जमले होते. निदर्शनादरम्यान ‘लाँग लाईव्ह काश्मीर’ आणि ‘लाँग लाईव्ह द पीपल’ अशा घोषणा देण्यात आल्या.

डुडियालच्या एएमबी भागात निदर्शने करणाऱ्या लोकांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला. यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले, असा आरोप संघटनेने केला आहे. जखमींची अधिकृत संख्या किंवा पाकिस्तान प्रशासनाकडून यावर प्रतिक्रिया आलेली नाही. जेएएसीने पाकिस्तानी दलांनी निषेध रॅलीवर छोटे बॉम्बही फेकल्याचा आरोप केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news