Terror Funding In Ramadan: आश्चर्य! रमजानमध्ये दहशतवाद्यांचं फंडिग थांबलं... पाकिस्तानच्या 'या'राज्यानं देणगी देणाऱ्यांना दिला इशारा

सरकारनं सांगितलं की कट्टरपंथीयांची आर्थिक नाकेबंदी करण्यात सामान्य जतनेची मोठी भूमिका आहे.
Terror Funding In Ramadan
Terror Funding In Ramadanpudhari Photo
Published on
Updated on

Terror Funding In Ramadan: पाकिस्तानमधील पंजाब सरकारनं रमजान महिन्यात नागरिकांना एक इशारा दिला आहे. सरकारनं लोकांनी आपली जकात, चॅरिटी आणि डोनेशन विचार करून द्यावी. कोणत्याही प्रतिबंधित संघटनेला आर्थिक मदत करू नये. पंजाब सरकारनं दहशतवादी विरोधी अॅक्ट १९९७ अंतर्गत अशा संघटनांना कोणत्या प्रकारची मदत करणं गुन्हा असल्याचं म्हटलं आहे. जर असं करताना कोणी आढळलं तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं देखील पंजाप सरकारनं म्हटलं आहे.

Terror Funding In Ramadan
Pakistan Army Gaza Deployment: ‘गाझा’ मुद्द्यावरून पाकिस्तान सैन्यात बंडाची चिन्हे; असीम मुनीर यांच्याविरोधात माजी सैनिकांचा एल्गार

पंजाब सरकारचे निर्देश

स्थानिक माध्यमांनुसार पंजाब सरकारनं बंदी असलेल्या संघटनांची एक यादी अधिकृतरित्या आपल्या वेबसाईटवर टाकली आहे. या यादीत दहशतवादी संघटना, कट्टर समूह आणि नोंदनी न केलेल्या ट्रस्ट यांचा समावेश आहे.

सरकारनं कट्टरपंथीयांची आर्थिक नाकेबंदी करण्यात सामान्य जतनेची मोठी भूमिका आहे. त्यामुळं सरकारनं लोकांना संस्थांना दान करण्यापूर्वी त्यांची पडताळणी करा आणि संशयित घडामोडींची माहिती लगेचच प्रशासनाला द्या असे निर्देश दिले आहेत.

Terror Funding In Ramadan
India Vs Pakistan Digital Reach: छप्पर फाड के... ICC T20 World Cup मध्ये कधी झालं नाही ते यंदाच्या भारत-पाक सामन्यात घडलं

भारतात दहशतवादी घोषित आहेत या संघटना

भारतात जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा, अल-कायदा, जमीयत-उल-अंसार, आयएसआयएस, हिज्ब-उत-तहरी या सारख्या संघटनांना भारत सरकारनं दहशतवादी घोषित केलं आहे. या संघटनांवर पाकिस्तानात देखील बंदी आहे. मात्र पाकिस्तान या संघटनांना दहशतवादी नाही तर कट्टरतावादी संघटना मानते. सरकारच्या आदेशानुसार आता अशा कोणत्याही संघटनांना आर्थिक मदत देणं गुन्हा मानला जाईल.

Terror Funding In Ramadan
IND vs PAK : मैदानात शत्रुत्व, बाहेर गळ्यात गळे..! पाक खेळाडूची गळाभेट घेणा-या रोहित शर्मावर भारतीय चाहते संतप्त(Video)

बलुचिस्तानमधील संघटनेबाबतही इशारा

पाकिस्तानमधील पंजाब सरकारच्या यादीत बलुचिस्तानमधील देखील काही संघटनांना समावेश आहे. यात तहरीक -ए-नफाज अमन, तहफ्फुज हुदूदुल्लाह, बलुचिस्तान वाजा लिबरेशन आर्मी, बलूच रिपब्लिकन पार्टी आझाद, बलुचिस्तान युनायटेड आर्मी, इस्माल मुजाहिदीन, जैश-अल-इस्लाम आणि बलुचिस्तान नॅशनल लिबरेशन आर्मी या संघटानांचा समावेश आहे.

इतर बंदी असलेल्या संघटनांमध्ये खाना-ए-हिकमत गिलगित-बाल्टिस्तान, तहरीक-ए-तालिबान स्वात, तहरीक-ए-तालिबान मोहम्मद, तारिक गीदर ग्रुप, अब्दुल्ला आजम ब्रिगेड, ईस्ट तुर्किस्तान इस्लामिक मूवमेंट, इस्लामिक मूवमेंट ऑफ उज्बेकिस्तान, इस्लामिक जिहाद यूनियन, 313 ब्रिगेड, तहरीक-ए-तालिबान बाजौर, अम्र बिल मारूफ वा नाही अनिल मुनकर (हाजी नमदार ग्रुप) आणि बलूच स्टुडंट ऑर्गनाईजेशन आझाद यांचा देखील समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news