Pakistan PM Statement On Kashmir: काश्मीर पाकिस्तानचा भाग होणार... फुटक्या कटोऱ्यातून कर्ज मागणाऱ्या शरीफांची मुक्ताफळे

Pakistan PM
Pakistan PMpudhari photo
Published on
Updated on

Pakistan PM Statement On Kashmir: पाकिस्तानची लष्करी आणि नागरी नेतृत्वाने ५ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा काश्मीरमधील लोकांना आपला न मागितलेले पाठिंबा दिला. यासाठी पाकिस्तानमध्ये अनेक मोर्चांचे आंदोलन करण्यात आले होते.

कथित काश्मीर एकदा दिवस प्रसंगी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी, 'जम्मू काश्मीर वादावर तोडगा म्हणजे काश्मीरमधील लोकांच्या इच्छेचा आदर करणं आणि युनायटेड नेशन सुरक्षा परिषदेचा ठरावावर अमंलबजावणी करणं.' अस वक्तव्य केलं. ते पाक व्याप्त काश्मीरमधील मुज्जफराबादमधील सभागृहात बोलत होते.

Pakistan PM
IND vs PAK Rivalry : ३४ वर्षांचा थरार, २२ लढती... जाणून घ्या भारत विरुद्ध पाकिस्तान ‘हाय व्होल्टेज’ सामन्यांची रंजक आकडेवारी

शहबाज यांनी आम्ही इथं आमच्या काश्मीरी भावांसाठी पाकिस्तानी लोकांच्या आणि पाकिस्तानी नेतृत्वाच्या वतीने आलो आहे. आम्ही काश्मीरच्या पाठीमागे खंबीर उभे आहोत. यानंतर शरीफ यांनी काश्मीर पाकिस्तानचा भाग होणार आहे असं वादग्रस्त वक्तव्य देखील केलं.

Pakistan PM
T20 World Cup : पाकिस्तान घाबरला..! मैदानात उतरण्यापूर्वीच भारताविरुद्ध टेकले गुडघे, १५ फेब्रुवारीच्या महामुकाबल्यातून माघार

भारताने जम्मू काश्मीर आणि लडाख हा यापूर्वी, आता आणि भविष्यातही आमचा भूभाग आहे हे कायम पाकिस्तानला सांगितलं आहे. नुकतेच २०२५ च्या मे महिन्यात पाकिस्तान आणि भारत यांच्यात लष्करी संघर्ष झाला होता. याची आठवण काढत काश्मीरचा मुद्दा राजनैतिक मार्गाने पुन्हा एकदा तावपण्याचा पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जाईल असं वकव्य शाहबाज शरीफ यांनी केलं.

Pakistan PM
पंतप्रधान मोदी पाकिस्तानात जाणार? शाहबाज शरीफ यांनी पाठवले निमंत्रण

याचबरोबर शाहबाज यांनी पाकिस्तानात वाढलेल्या दहशतवादी कारवायांना भारताला जबाबदार धरलं आहे. त्यांनी भारतानं छुप्या पद्धतीनं पाकिस्तानातील दहशतवाद वाढवला आहे. ते म्हणाले, 'आम्हाला शांतता हवी आहे मात्र शांतता ही समानता आणि न्याय याच्यावर आधारलेली असते.'

Pakistan PM
Palghar Tension‌ : ‘काश्मीर बनेगा पाकिस्तान‌’ गाणे पालघरमध्ये वाजवले

शरीफ यांनी काश्मीरची तुलना पॅलस्टाईनशी करत बुऱ्हान वानी, दिवंगत फुटीरतावादी नेते सईद अली गिलानी, यासिन मलिक, मीरवैज उमर फारूक आणि इतर फुटीरतावादी नेत्यांची देखील आठवण काढली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news