LPG Gas Price In Pakistan: ३५०० रूपये गॅस तर ४५८ रू. पेट्रोल... जागतिक 'मध्यस्थी' करणाऱ्या पाकिस्तानला घर सांभाळता येईना

LPG Gas Price In Pakistan
LPG Gas Price In Pakistanpudhari
Published on
Updated on

LPG Gas Price In Pakistan: अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाचा आणि युद्धाचा परिणाम जागतिक ऊर्जा संकटावर होत असताना, भारताचा शेजारी देश पाकिस्तानला याचा सर्वात भयानक फटका बसला आहे. युद्ध दुसऱ्या देशांत सुरू असले तरी त्याची मोठी किंमत पाकिस्तानच्या सामान्य जनतेला मोजावी लागत आहे. पाकिस्तान सरकार जनतेला दिलासा देण्याऐवजी करात वाढ आणि अनुदानात (Subsidy) कपात करत असल्याने तेथील नागरिक हवालदिल झाले आहेत.

LPG Gas Price In Pakistan
Iran War Effect On Pakistan: पेट्रोल ३२१ रूपये लिटर, त्यात पगारही कट... इराण युद्धाचा पाक नागरिकांना तोंड दाबून बुक्यांचा मार

इंधनाच्या दरात विक्रमी वाढ

गेल्या काही आठवड्यांत इंधनाच्या दरात २० टक्क्यांहून अधिक वाढ केल्यानंतर, आता पुन्हा एकदा दरवाढीचा मोठा धक्का देण्यात आला आहे. डिझेलच्या किमतीत तब्बल ५४.९% ची वाढ झाली असून ते आता ५२०.३५ पाकिस्तानी रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तर पेट्रोलच्या किमतीत ४२.७% ची वाढ होऊन ते ४५८.४० रुपये प्रति लिटर झाले आहे. यामुळे वाहतूक खर्च वाढल्याने सर्वच जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत.

LPG Gas Price In Pakistan
Pakistan petrol price | पाकमध्ये पेट्रोल 335 रुपये लिटर

विजेचे संकट आणि गॅसचा भडका

पाकिस्तानमध्ये वीज आणि गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत २,६६५ रुपये होती, ती आता ३,५०० रुपयांवर पोहोचली आहे. एका महिन्यात ९०० रुपयांची ही वाढ सामान्य कुटुंबांचे बजेट कोलमडवणारी ठरली आहे. तसेच सरकारने वीज दरात प्रति युनिट १.६२ रुपयांची वाढ केली असून आशियातील सर्वात महागडी वीज सध्या पाकिस्तानात मिळत आहे.

LPG Gas Price In Pakistan
LPG Supply Explained | आपल्या घरातला गॅस नेमका कुठून येतो, कतारचा संबंध काय? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या?

खाद्यपदार्थांचे भाव गगनाला

महागाईचा दर ७.३ टक्क्यांवर गेल्याने अन्नासाठी लोकांची वणवण सुरू आहे. २० किलो पिठाच्या गोणीची किंमत २,००० रुपयांपर्यंत पोहोचली आहे, तर १ किलो पीठ १६० रुपयांना मिळत आहे. डाळींचे भाव २५० रुपयांवरून थेट ४५० रुपयांपर्यंत वाढले आहेत. भाजीपाल्यामध्ये टोमॅटो २५० रुपये किलो, तर कांदा ८० रुपये किलो दराने विकला जात आहे.

LPG Gas Price In Pakistan
LPG Crisis Debate|संसदेत LPG संकटावर चर्चा, राहुल गांधींनी व्‍यक्‍त केली 'भीती'; पेट्रोलियन मंत्री पुरींनी दिले प्रत्युत्तर

लोन महागले आणि सरकारचा असहयोग

आर्थिक परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने व्याजाचा दर १०.५ टक्के केला आहे. यामुळे होम लोन, बिझनेस लोन आणि पर्सनल लोन महाग झाले असून मध्यमवर्गीयांची कंबरडे मोडले आहे. आयएमएफकडून (IMF) कर्ज घेण्यासाठी पाकिस्तान सरकारने जनतेला मिळणारी सबसिडी कमी केली आहे आणि करांचा बोजा वाढवला आहे. थोडक्यात, जागतिक युद्ध आणि देशांतर्गत चुकीच्या धोरणांमुळे पाकिस्तान सध्या अत्यंत भीषण संकटातून जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news