Iran War Effect On Pakistan: पेट्रोल ३२१ रूपये लिटर, त्यात पगारही कट... इराण युद्धाचा पाक नागरिकांना तोंड दाबून बुक्यांचा मार

Iran War Effect On Pakistan
Iran War Effect On Pakistanpudhari
Published on
Updated on

Iran War Effect On Pakistan: इराण-इस्त्रायल-अमेरिका युद्धाचा परिणाम अख्ख्या जगावर पडला आहे. जग ज्याच्यावर चालत त्या दोन गोष्टी कच्च तेल आणि गॅस याची मारामार सुरू झाली आहे. अनेक देशांनी पर्यायी मार्गांनी तेलाची वाहतूक करण्यास सुरूवात केली असून मार्केटमधून चढ्या दरानं तेल आणि गॅस खरेदी केली जात आहे. भारतात देखील पेट्रोल आणि घरगुती गॅसचा तुटवडा भासत आहे.

मात्र इराण युद्धामुळं भारताचा शेजारी देश पाकिस्तानची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. आधीच आर्थिक परिस्थिती भके कंगाल असताना पाकिस्तानात वाढलेल्या पेट्रोल दरामुळं आणि पगार कपातीमुळं सामान्य नागरिकांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली आहे.

Iran War Effect On Pakistan
Iran America conflict | दोन दिवसांत ८० इंडक्शन स्टोव्ह विकले : आयुष्यात एवढी विक्री कधीच पाहिली नाही!

वर्क फ्रोम होमचे आदेश

सरकारनं तेलाच्या तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी नागरिकांना घरातून काम करण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर शाळा बद करून मंत्र्यांचा पगार देखील कापला आहे.

पाकिस्तान आपली अर्थव्यवस्था चालवण्यासाठी आयात केलेल्या तेलावर आणि गॅसवर जास्तच अवलंबून आहे. त्यात इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यामुळं पाकिस्तानला मोठा फटका बसत आहे. त्यांचे सर्वात जास्त तेल याच मार्गातून येते. त्यामुंळ पाकिस्तानात इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच जागतिक तेल बाजारातील गगनाला भिडलेल्या किंमती यामुळं त्यांना आपले रिझर्व ऑईलवर अवलंबून रहावं लागत आहे. अशा प्रकारे फार दिवस काम चालवता येणार नाहीये.

काय उपाय योजना केल्या आहेत?

  • सरकारी कर्मचाऱ्यांना चार दिवसांचे काम

  • सरकारी कर्मचारी ५० टक्के घरून आणि ५० टक्के ऑफिसमधून काम करणार

  • खासगी कंपन्यांनादेखील वर्क फ्रॉम होम धोरण अवलंबण्यास सांगण्यात आलं आहे.

  • राज्य आणि केंद्रीय मंत्रीमंडळातील सदस्यांचे दोन महिन्याचे वेतन आणि भत्ता मिळणार नाही.

  • आमदारांची २५ टक्के पगार कपात करण्यात आली आहे.

Iran War Effect On Pakistan
Iran Israel US War Update: आमच्या 'या' तीन अटी मान्य करा युद्ध थांबवतो... इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी केलं ट्विट

आयात खर्च वाढण्याची शक्यता

पाकिस्तानकडे परदेशी चलन आधीच खूप कमी आहे. त्यात तेलाच्या किंमती अचानक वाढल्यामुळं पाकिस्तानाच गंभीर आर्थिक संकट निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार युद्धामुळं तेल पुरवठ्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यातच पाकिस्तानचे महिन्याचे तेल आयातीचे बील वाढून जवळपास ६० कोटी डॉलर इतकं पोहचण्याची शक्यता आहे. नाजूक अर्थिक स्थिती असलेल्या पाकिस्तानवर हा अतिरिक्त बोजा असणार आहे.

Iran War Effect On Pakistan
Pakistan Controversy : ‘पाकिस्तान संघासाठी योजना आखणाऱ्याला गोळी घाला’ : बांगला देशविरुद्धच्या पराभवानंतर जोरदार टीका

पेट्रोल डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या

इराण युद्धाचा सर्वात जास्त प्रभाव हा इंधनावर पडला आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल - डिझेल आणि गॅसच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. गेल्या शुक्रवारी ६ मार्च रोजी पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि हाय स्पीड डिझेलमध्ये प्रती लिटर ५५ रूपयांची वाढ केली होती. त्यामुळं आता पाकिस्तानात पेट्रोलची प्रती लीटर किंमत ही ३२१ रूपये झाली आहे. तर हाय स्पीड डिथेल ३३५.८६ रूपये लिटर झालं आहे. यापूर्वी पेट्रोलचे दर २६६.१७ रूपये लीटर होतं.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अचानक वाढ झाल्यामुळं पाकिस्तानमधील नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. कराची, लाहोर आणि इस्लामाबादसह अनेक प्रमुख शहरांमध्ये शेकडो लोक पेट्रोल पंपांवर गर्दी करत आहेत. पेट्रोलचा तुटवडा जाणवण्याची शक्यता निर्माण झाल्यानं लोकांनी पंपाबाहेर मोठी गर्दी केली आहे.

Iran War Effect On Pakistan
US military aircraft crash: अमेरिकन लष्कराला मोठा धक्का! इराणविरुद्धच्या मोहिमेवरील विमान इराकमध्ये कोसळले; ५ जवान बेपत्ता

महागाई वाढली

इंधन महाग झाल्यामुळ पाकिस्तानमधील हवाई प्रवास देखील महाग झाला आहे. स्थानिक हवाई तिकीटांमध्ये २८०० ते थेट ५००० रूपयांपर्यंत पोहचलं आहे. आधी जे तिकीट १०००० ते १५००० पाकिस्तानी रूपयांमध्ये मिळत होतं ते आता १७००० ते २०००० पाकिस्तानी रूपयांपर्यंत मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news