Pakistan News | पाकिस्तानचा बांगलादेशला मोठा धक्का! अणू प्रकल्पासाठी रशियाहून येणारे युरेनिअमचे विमान रोखले

Pakistan News | 'रूपपूर'साठी येणाऱ्या युरेनिअमच्या मार्गात खोडा ; हवाई मार्गच रोखला
flight
flightfile photo
Published on: 
Updated on: 

ढाका : वृत्तसंस्था

पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्राच्या वापराची परवानगी न दिल्याने बांगलादेशच्या रूपपूर न्यूक्लिअर पॉवर प्लांटसाठी येणाऱ्या युरेनिअमची वाहतूक थांबली आहे. बांगलादेशमधील रूपपूर न्यूक्लिअर पॉवर प्लांटच्या युनिट २ साठीचे न्यूक्लिअर फ्यूएल (अणुइंधन) २४ सप्टेंबरला पोहोचणे अपेक्षित होते. परंतु एअरस्पेस ब्लॉकमुळे ते अद्याप पोहोचलेले नाही.

flight
BAN vs PAK Test : पाकिस्तानचे बांगला देशसमोर लोटांगण! ढाका कसोटीत 104 धावांनी लाजिरवाणा पराभव

बांगलादेश अणुऊर्जा प्रकल्पांसाठी लागणारे युरेनिअम रशियाकडून आयात करतो. बांगलादेशचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री फकीर महबूब अनाम यांनी 'एनआय' वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, 'रूपपूर' प्लांटसाठी रशियातून युरेनिअम घेऊन येणारे कार्गो विमान २४ सप्टेंबरला पोहोचणार होते.

मात्र, या विमानाला पाकिस्तानने आपली हवाई हद्द वापरण्याची परवानगी नाकारल्याने युरेनिअम ठरलेल्या वेळी बांगलादेशात पोहोचू शकले नाही. पाकने एअरस्पेस क्लिअरन्स न देण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, रशियाने आम्हाला हे युरेनिअम बांगलादेशात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाठवण्याची गवाही दिली आहे, असेही अनाम यांनी सांगितले.

flight
Hadi murder case : हादी हत्या प्रकरणातील आरोपी मेघालय सीमेवरून भारतात पसार : ढाका पोलिसांचा दावा

'रूपपूर' हा बांगलादेशचा पहिला न्यूक्लिअर पॉवर प्लांट पबना जिल्ह्यात पद्मा नदीच्या काठावर बांधला जात आहे. हा प्रकल्प रशियन फेडरेशनच्या स्टेट ॲटोमिक एनर्जी कॉर्पोरेशन (रोसाटॉम) च्या तांत्रिक मदतीने व बांगलादेश ॲटोमिक एनर्जी कमिशनच्या देखरेखीखाली उभारला जात आहे. रशियाकडून या प्रकल्पाच्या युनिट १ साठीची कमी समृद्ध युरेनिअम इंधनाची पहिली खेप सुरक्षितपणे पोहोचल्यामुळे बांगलादेशने अधिकृतपणे अण्युगात प्रवेश केला होता.

अमेरिकेच्या सांगण्यावरून कृती?

पाकिस्तानने अमेरिकेच्या सांगण्यावरूनच रशियाकडून बांगलादेशाला जाणारे युरेनिअम इंधनाचे कार्गो विमान अडवून ठेवल्याची चर्चा आहे. अमेरिका बांगलादेशात प्रभाव वाढवत आहे. बांगलादेशवर रशियन प्रभाव वाढू नये, असे वाटत असल्यानेच अमेरिकेने पाकिस्तानकरवी हे कृत्य केल्याची चर्चा आहे.

"आम्ही विमानतळावर सर्व तयारी पूर्ण केली होती आणि वाट पाहात होतो. परंतु, एअरस्पेस साफ नाही, त्यामुळे आम्ही ते पाठवू शकलो नाही, असे 'रोसाटॉम'च्या संपर्क अधिकाऱ्याने आम्हाला कळवले."

- शेख मोहम्मद तौहिदुल इस्लाम (सहसचिव, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, बांगलादेश)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news