

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी असा दावा केला आहे की, या वर्षाच्या सुरुवातीला भारतासोबत झालेल्या लष्करी संघर्षात पाकिस्तानला ‘अल्लाहच्या हस्तक्षेपाने’ मदत केली. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
10 डिसेंबर रोजी झालेल्या एका भाषणातील या क्लिपमध्ये मुनीर धार्मिक संदर्भांचा वापर करताना दिसत आहेत. मे महिन्यात भारताने पुकारलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर ते भाष्य करत होते. धार्मिक संदर्भांचा वापर: उर्दूमध्ये भाषण करताना मुनीर यांनी कुराणातील एका वचनाचा उल्लेख केला “जर अल्लाह तुम्हाला मदत करत असेल, तर कोणीही तुमच्यावर विजय मिळवू शकत नाही.” संघर्षाच्या कठीण काळात पाकिस्तानला अद़ृश्य शक्तींनी मदत केली आणि ती मदत लष्कराला ‘जाणवली’, असे सूचक विधान त्यांनी केले.
पाकिस्तानचे संरक्षण दलाचे प्रमुख फिल्ड मार्शल सय्यद असीम मुनीर यांना सोमवारी त्यांच्या सौदी अरेबियाच्या अधिकृत दौर्यादरम्यान सौदीचा सर्वोच्च नागरी सन्मान किंग अब्दुलअजीज मेडल ऑफ एक्सलन्स देऊन गौरवण्यात आले.