Asim Munir China visit : पोलादा सारखी आमची मैत्री; चीन दौऱ्यावर असलेल्या पाक लष्करप्रमुखांनी गायले मैत्रीचे गोडवे

Pakistan China relations : पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर हे सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यात प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.
Asim Munir China visit
Asim Munir China visitfile photo
Published on
Updated on

Asim Munir China visit

बीजिंग : पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर हे सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा दोन्ही देशांमधील व्यूहात्मक संबंध अधिक घट्ट करण्याच्या उद्देशाने महत्त्वाचा मानला जात आहे. बीजिंगमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील मैत्रीचे गोडवे गायले.

या भेटीदरम्यान, चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी मुनीर यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, "पाकिस्तानी लष्कर हे चीन-पाक मैत्रीचे खंदे समर्थक आणि राष्ट्रीय हिताचे रक्षक आहे. चीन आणि पाकिस्तान हे कायमचे मित्र असून आमची मैत्री अतूट आहे. आम्ही प्रत्येक कठीण काळात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो." चीन पाकिस्तानला आपल्या परराष्ट्र धोरणात नेहमीच प्राधान्य देईल, असे आश्वासनही वांग यी यांनी दिले. ते म्हणाले की, दोन्ही देशांच्या नेत्यांनी घेतलेले निर्णय आणि करार लागू करण्यासाठी चीन कटिबद्ध आहे, जेणेकरून प्रादेशिक शांतता आणि स्थिरता टिकून राहील.

Asim Munir China visit
Ramayana in Pakistan | पाकिस्तानात रामायणाचे भव्य सादरीकरण; सर्व कलाकार मुस्लीम, AI मुळे महाकाव्याला आधुनिक झलक

'चीन आमचा आयर्न ब्रदर' : जनरल मुनीर

यावेळी बोलताना जनरल आसिम मुनीर यांनी चीनसोबतच्या मैत्रीला विशेष महत्त्व दिले. ते म्हणाले, "पाकिस्तान आणि चीनची बंधुत्वावर आधारित मैत्री काळाच्या कसोटीवर खरी उतरली असून ती खडकासारखी मजबूत आहे. चीन हा पाकिस्तानचा 'आयर्न ब्रदर' आहे." पाकिस्तानच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात चीनने दिलेल्या दीर्घकालीन पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले. मुनीर यांनी ग्वाही दिली की, "पाकिस्तानी लष्कर चीनचे नागरिक, त्यांचे प्रकल्प आणि संस्थांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलेल." यासोबतच, दोन्ही नेत्यांनी दहशतवादाविरोधात सहकार्य वाढवण्यावर आणि समान हिताच्या प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news