

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. काल रात्री पाकिस्तानने ऑपरेशन गजब लिल हक अंतर्गत काबूलमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये रूग्णालयाला टार्गेट करण्यात आलं. अफगाणी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात ४०० निष्पापनागरिकांचा जीव गेला आहे. तर २५० पेक्षा जास्त लोकं जखमी झाले आहेत.
पाकिस्तानने या हल्ल्याचे फुटेज सोशल मीडियावर शेअर करत आम्ही सैन्य ठिकाणांवर हल्ला केल्याचं सांगितलं. या हल्ल्यानंतर इस्लामिक एमिरेट्स ऑफ अफगाणिस्तानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहीद यांनी टोलो न्यूजला सांगितलं की पाकिस्तानसोबतच्या कुटनैतिक चर्चेची वेळ आता निघून गेली आहे. आता अफगाणिस्तान बदला घेणार, डूरंड लाईनवर दोन्ही देशांचे सैन्य सतत एकमेकांना भिडत आहे.
दोन्ही देशातील लष्करी संघर्षानंतर नेते देखील एकमेकांविरूद्ध वाकयुद्ध सुरू केलं. अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्र्यांनी जर काबूलवर हल्ला झाला तर इस्लामाबाद निशाण्यावर असणार असा इशारा दिला होता. यानंतर तालिबानने पाकिस्तानातील इस्लामाबाद, क्वेट्टा आणि रावळपिंडीमधील पाकिस्तानी लष्कराच्या तळांवर हल्ला केल्याचा दावा केला. तालिबानने पाकिस्तानचा महत्वाचा एअर बेस नूर खान एअरबेसवर हल्ला केल्याचा दावा केला आहे.
पाकिस्तानने काबूल आणि नंगरहारमध्ये हल्ला आपल्या सुरक्षेसाठी गरजेचा होता असं सांगितलं. पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी नुकतेच अफगाण - तालिबानने पाकिस्तानमधील नागरिकांना टार्गेट करून रेड लाईन क्रॉस केल्याचे सांगितलं होत. यानंतर लगेच रात्री काबूलमध्ये तुफान बॉम्ब वर्षावर झाला. पाकिस्तानने दावा केला की त्यांनी लष्करी तळांवर हल्ला केला आहे.
दोन्ही देशांमध्ये सीमा वाद विकोपाला पोहचला आहे. सीमेवर परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. डूरंड लाईनवर दोन्ही देशांचे लष्कर एकमेकांवर गोळीबार करत आहे. पाकिस्तानकडून काबूल रुग्णालयावरील हल्ल्याचे फुटेज प्रसिद्ध केल्यानंतर अफगाणिस्तान देखील चिडलेला आहे. तालिबानने सांगितलं की त्यांच्या लष्करानं कडक प्रत्युत्तर दिलं असून आता या भागात मोठ्या युद्धाचा धोका कित्येक पटीनं वाढला आहे.