

Pakistan accepts 7 facts Operation Sindoor: भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०२५ च्या मे महिन्यात लष्करी संघर्ष झाला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर लाँच करत पाकिस्तानच्या अनेक सैन्य ठिकाणांवर आणि दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. याला पाकिस्तानने देखील प्रत्युत्तर देण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला होता.
मात्र पाकिस्तानने सालाबादप्रमाणे या संघर्षात आमचीच सरशी कशी झाली अशी टिमकी वाजवली होती. त्यामुळं भारताच्या लष्करी कारवाईच्या यशाभोवती संशयाचे ढग दाटले. मात्र आता ऑपरेशन सिंदूरच्या ७ महिन्यानंतर पाकिस्ताननं ऑपरेशन सिंदूरबाबतचे ७ सत्य स्विकारले आहेत.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी नुकतेच एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी पहिल्यांदाच भारतानं त्यांचा सर्वात महत्वाचा एअर बेस नूर खान एअरबेसचं मोठं नुकसान केल्याची कबुली दिली आहे. हे त्यांचे वक्तव्य ऑपरेशन सिंदूरनंतर ७ महिन्यांनी आलं आहे.
इशाक डार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत अनेक महत्वाच्या बाबी समोर ठेवल्या. यापूर्वी या गोष्टी पाकिस्तान लपवत होता.
पाकिस्ताननं आता मान्य केलं आहे की १० मे च्या सकाळी भारताने रावळपिंडीजवळील नूर खान एअरबेसवर हल्ला केला होता. हा पाकिस्तानच्या हवाई दलाचा सर्वात महत्वाचा एअर बेस आहे. त्यांचे सैनिक मुख्यालय देखील तेथून जवळ आहे.
डार यांनी भारताच्या या हल्ल्यात एअरबेसवरच्या अनेक इमारतींचे नुकसान झाले. अनेक सैनिक जखमी झाले असे सांगितले. ते हे छोटं नुकासन असल्याचं सांगत होते. मात्र त्यांनी हे सार्वजनिकरित्या मान्य केलं आहे.
पाकिस्तानने दावा केला आहे की भारताने ३६ तासात जवळपास ८० ड्रोन पाठवले होते. त्यातील एकाने नूर खान एअर बेसला नुकसान पोहचवलं.
सुरूवातीला भारतानं ब्रम्होस मिसाईलद्वारे अनेक एअरबेसला टार्गेट केल्याची माहिती समोर आली होती. आता या माहितीला पाकिस्तानने दुजोरा दिला आहे. ब्रम्होसच्या अचूक निशाण्यामुळं पाकिस्तान एअर डिफेन्स सिस्टमला तगडं आव्हान मिळालं होतं.
डार यांनी सांगितले की ९ मे रोजी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली लष्कर आणि नागरिक नेत्यांची आपात्कालीन बैठक झाली. या हल्ल्यामुळं पाकिस्तानमध्ये दहशत निर्माण झाली होती.
डार यांनी सांगितले की नूर खान एअरबेसवर हल्ला हा भारताची चूक होती. डार यांच्या या वक्तव्यावरून नूर खान एअरबेस त्यांच्यासाठी किती महत्वाचा होता अन् भारताचा हल्ला किती प्रभावी होता हे दिसून येतं.
पाकिस्ताननं मान्य केलं की हल्ल्यानंतर स्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय दबाव असल्यानं सीजफायर झाले. पहिल्यांदा पाकिस्ताननं कोणतंही मोठं नुकसान झालं नसल्यांच सांगितलं होतं आता पोटातून सत्य बाहेर आलं आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं आपली लष्करी ताकद दाखवली. ब्रम्होस मिसाईल आणि ड्रोन यांच्या अचून निशाण्यामुळं संपूर्ण जर आश्चर्यचकित झालं आहे. पाकिस्तान यापूर्वी हे सत्य नाकारत होता. मात्र आता डार यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी भारताची लष्करी ताकद मान्य केल्याचं दिसत आहे. जाणकारांच्या मते युद्धाला तोंड न फोडता दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची ही नवी रणनिती आहे.